मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात भरती, 90,000 रुपये पगार मिळेल

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल (Bhabha Atomic Research Centre Hospital Bharti 2022)मध्ये विविध जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Hospital Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१) पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी

२) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MS/MD/DNB डिग्री किंवा डिप्लोमापर्यंत (डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.) पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना डिप्लोमानंतर संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवाराचं शिक्षण हे 2016 च्या आधी झालं असणं आवश्यक आहे. तसंच अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वेतन :

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – 86,000/- – 90,000/ – रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर – 72,000/- – 74,000/ – रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता : तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


इतर सरकारी नोकरी –

‘इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधीनाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.