पाण्यात मीठ टाकून स्नान केल्याने होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

आपल्याला विश्रांती घेऊन जितकं ताजतवानं वाटतं, कदाचित थोडं जास्त अंघोळ केल्यावर वाटतं. आपल्याला हवं तसं गार-गरम पाणी अंगावर पडलं की उत्साहाने आपण कामाची सुरुवात करतो. आपल्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याचं केव्हातरी आपल्या कानावर पडलेलं असतं पण या पाण्यात मीठ घालण्याचे काय लाभ होतात, हे आपल्याला माहित नसतात. तेच आपण या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

संसर्ग होण्याची शक्यता कमी

आपल्याला विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होताना दिसतात. त्यांवर मिठाचे पाणी हा सर्वात योग्य उपाय आहे. कारण मीठ हे संसर्ग होण्यापासून बचाव करतं. म्हणून जर मीठाच्या पाण्याने अंघोळ केली असता त्वचेवरील छिद्रे उघडली जातात. म्हणून संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

फोड येणार नाहीत.

वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो, तसेच आपल्या शरीरातील अंतर्गत बिघाडामुळे किंवा अलर्जीमुळे आपल्या त्वचेवर बऱ्याच वेळेस फोड येतात. म्हणून जर त्वचेवरील छिद्रे उघडी झाल्याने शरीरात नको असणारे विषाक्त किंवा टाकाऊ पदार्थ हे बाहेर पडून शरीर शुद्धी सहज होते व त्वचेवरील पुरळ जो त्रास होतो तो होत नाही.

सांधेदुखीपासून मिळतो आराम

हवेतील गारव्याने बहुतांश जणांना सांधेदुखीची समस्या सतावत असते. स्नानाच्या आधी केवळ दोन चिमटी मीठ जर का पाण्यात घातलं तर या हाडांच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच पायांमध्ये वेदना जाणवत असतील तर पाणी जरा उकळून घेऊन त्यात थोडं मीठ घालून त्या पाणी पायांवर हळूहळू ओतलं असता याचाही अपेक्षित लाभ होतो व दुखणे कमी होते.

ताण दूर करण्यास मदत होते

सध्या प्रत्येकाचं आयुष्य धकाधकीचं आहे. त्यामुळे ताणतणावाचा सामना करावा लागतो. हा ताणताणाव नकोसं करून टाकतो. मिठाच्या पाण्याने अंघोळ केली असता मिठामधील खनिजपदार्थ हे शरीरात घेतले जातात. शरीर आतून शुद्ध झाल्यामुळे मेंदू याचा योग्य परिणाम होऊन आलेला ताणताणाव दूर होण्यास मदत होते. व आपल्याला प्रसन्न वाटते.

म्हणून मीठ हे केवळ जेवणाची चव चांगली करत नाही, तर आयुष्याचीही करते म्हणून यापुढे आपणही नक्कीच मीठ घालून अंघोळ करण्याचे फायदे मिळवाल, अशी आशा आहे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole