प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

चर्चेत का आहे?

  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Yojana) लागू करण्यासाठी जबाबदार संस्था ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने योजनेअंतर्गत आरोग्य लाभ पॅकेजमध्ये सुधारणा केली आहे.
  • आरोग्य लाभ पॅकेजच्या (HBP 2.2) सुधारित आवृत्तीमध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत काही पॅकेजेसचे दर २०% ते ४००% पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
  • काळ्या बुरशीशी (black fungus) संबंधित एका नवीन अतिरिक्त वैद्यकीय व्यवस्थापन पॅकेजचा देखील योजनेत समावेश करण्यात आला आहे.

काय आहे योजना ?

  • सुरुवात – २३ सप्टेंबर २०१८
  • जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी विमा योजना आहे.
  • ही योजना भारतातील सार्वजनिक आणि खाजगी सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारांसाठी लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत निधी प्रदान करते.
  • व्याप्ती – १०.७४ कोटीहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबांना (किंवा सुमारे ५० कोटी लाभार्थी) या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. या योजनेमध्ये लाभार्थीला सेवा स्थळावर कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते.
  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA-National Health Authority) ही देशभरात योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख संस्था आहे. ही योजना मध्यवर्ती क्षेत्रातील काही घटकांसह केंद्र पुरस्कृत योजना आहे.
  • लाभार्थी कुटुंबांची निवड ग्रामीण व शहरी भागातील निवडक वंचितता आणि व्यावसायिक निकषांच्या आधारावर २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेतून (SECC) करण्यात येते.
  • पश्चिम बंगाल, दिल्ली (NCT) आणि ओडिशा वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू आहे.

Ayushman Bharat Yojana योजने अंतर्गत पात्रता –

  • या योजनेअंतर्गत कुटुंब आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.
  • या योजनेअंतर्गत, आधीपासून अस्तित्वात असलेल्या विविध वैदयकीय अटी आणि गंभीर आजार पहिल्या दिवसापासून संरक्षित आहेत.
  • रुग्णालयात दाखल होण्याच्या ३ दिवस आधी आणि डिस्चार्जनंतर १५ दिवस क्लिनिकल उपचार, आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध आहेत.
  • ही एक पोर्टेबल योजना आहे म्हणजेच लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात त्याचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेमध्ये औषधे, निदान सेवा, फिजिशियन फी, रूम फी, ICU शुल्क इत्यादी सारख्या सुमारे १२९३ प्रक्रिया आणि पॅकेज (मोफत) समाविष्ट आहेत.

आरोग्य मंथन ३.०

  • आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (AB PMJAY) ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आरोग्य मथन ३.० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  • आयोजक राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण
  • कालावधी – २३ ते २७ सप्टेंबर २०२१

आरोग्य धारा २.० सत्र

  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्यक्रमाची भारतातील गरीब कुटुंबांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी आणि योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘आरोग्य धारा २.०’ या आभासी सत्राचे उद्घाटन केले.
  • १८ ऑगस्ट २०२१ रोजी AB-PMJAY योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या आणि उपचार घेतलेल्या लोकांचा २ कोटीचा टप्पा पार केल्यानिमित्ताने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

आयुष्मान मित्र – या अंतर्गत सामान्य लोकांमध्ये AB PMJAY या योजनेबददल जागरूकता पसरवतील असे स्वयंसेवक जन आरोग्य योजनेशी जोडले जातील. जे कमी शिक्षित लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, त्यांना ‘आयुष्मान मित्र स्वयंसेवक’ योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करतील. तसेच लाभार्थ्याचे बनलेले ‘आयुष्मान कार्ड’ मिळवण्यास त्यांना मदत करतील.

आयुष्मान अधिकार पत्र – या योजनेअंतर्गत रुग्णालयात जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जन आरोग्य योजनेचे लाभार्थी म्हणून त्याला कोणते अधिकार आहेत आणि कोणत्या सुविधा मिळू शकतात ही माहिती या पत्राद्वारे दिली जाईल.

आयुष्मान अभिनंदन पत्र – हे एक धन्यवाद पत्र आहे. AB PMJAY अंतर्गत उपचारानंतर डिस्चार्जच्या वेळी या योजनेच्या लाभार्थ्यांना हे पत्र दिलले जाईल.


सर्व सरकारी योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole