अमृत मोहीम (AMRUT 2.0)

चर्चेत का आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर २०२१ रोजी अमृत – ‘अटल मिशन फॉर रिज्युवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’चा ( AMRUT 2.0) दुसरा टप्पा सुरू केला.

सुमारे ४,७०० शहरी स्थानिक संस्थामधील सर्व घरांना पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने १००% कव्हरेज प्रदान करणे हे अमृत २.० चे लक्ष्य आहे.

स्टार्टअप आणि उद्योजकांना (सार्वजनिक खाजगी भागीदारीने) प्रोत्साहित करून आत्मनिर्भर भारताच्या उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

काय आहे मोहीम?

AMRUT – Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation

सुरुवात २५ जून २०१५

प्रमुख मंत्रालय – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय उद्देश – शहरी परिवर्तनासाठी पुरेसे मजबूत सांडपाणी नेटवर्क आणि ‘पाणी पुरवठा सुनिश्चित करू शकणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापन करणे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मोहिमेचे (JNNURM) नामकरण अमृत असे करण्यात आले आहे. JNNURM ही योजना ३ डिसेंबर २००५ रोजी सुरु करण्यात आली होती.

अमृत अंतर्गत राज्य वार्षिक कृती योजना सादर करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य आहे.

२०२२ पर्यंत सर्वांसाठी गृहनिर्माण योजना आणि अमृत मोहीम एकाच दिवशी सुरु करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील कामगिरी –

  • अमृत मिशन अंतर्गत शहरांमध्ये १.१४ कोटी नळ जोडण्यांसह एकूण ४.१४ कोटी जोडणी साध्य करण्यात आली आहे.
  • ४७० शहरांमध्ये क्रेडिट रेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी १६४ शहरांना ‘Investible Grade Rating’ (IGR) प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये ३६ शहरांना A- किंवा त्यापेक्षा जास्त दर्जा देण्यात आला आहे.
  • १० शहरी स्थानिक संस्थानी म्युनिसिपल बॉण्ड्सद्वारे ३८४० कोटी रुपये उभारले आहेत.

सर्व सरकारी योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole