आपण जास्त वेळ फेसबुक, इंस्टा वरच पडून असता का? असा होईल तोटा..

आपण काय करतो, कुठे जातो, काय नवीन घेतो, काय खातो, अशा सगळ्या गोष्टी आपण स्टेट्सला ठेवतो. कुणाचं काय नवीन जुनं कळण्यासाठी आपण फेसबुक सकाळी सकाळी उघडून बसतो. कसलीही नोटीफिकेशन कोणत्याही सोशल नेटवर्किंग अॅपवर आली तर लगेच उघडून आपण ती पाहतो, जवळच्या व्यक्तीची असेल लाईक, कमेंट करतो. व्हॉट्स अॅप किंवा मेसेंजर वर आलेल्या मेसेजला रिप्लाय देण्याची घाई आपल्याला असते. सतत सकाळ, दुपार, संध्याकाळचे मेसेज पाठवण्याच्या कामात काही लोक व्यग्र असतात. नका पाठवूट असं सांगितलं असताना सुद्धा ते स्वतःला थांबवू शकत नाहीत. म्हणून ते बऱ्याच ग्रुप्समध्ये असे लोक लक्ष ठरतात. सतत कोणत्या न कोणत्या अॅपवर दिवसाचा वेळ घालवणं ही सवयच खूप लोकांना लागलेली असते. पण याच्यापेक्षा प्रकरण पुढं गेलं असेल तर आपल्याला या सोशल मिडिया अॅपचं व्यसन लागलं आहे, असं म्हणता येईल. पण हे लवकर थांबवता यायला हवं कारण हे व्यसन लागल्याचा आपल्यावर वाईट परिणाम (Adverse effects due to spending more time on social networking sites) झालेला असतो.

आपली वागणुक कशी बदलत आहे?

१. आपण बिछान्यावर जाऊन पडतो, परंतु आपल्याला झोप येत नाही म्हणून मग आपण इंस्टा, युट्युब वरचे रील्स व अन्य व्हिडीओ पाहत बसतो किंवा फेसबुकवरच्या मोठमोठाल्या पोस्ट्स वाचत राहतो, हे केल्यानंतर मेंदू थकतो आणि काही वेळाने आपण झोपी जातो. रात्रीची शांत झोप घेण्यासाठी आपल्याला मोबाईलचा आधार घ्यावा लागतो. 

जाग आली तरी एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या दिवसाची उत्साही सुरुवात करण्यापेक्षा आपण सकाळीही मोबाईल हातात घेतो. आदल्या दिवशी राहिलेल्या गोष्टी कोणाच्या काही कमेंट्स, लाईक्स, चेक करण्याची धडपड आपली असते. म्हणजे झोपताना मोबाईल, सकाळी उठल्यावर मोबाईल हेच आपलं चालू असतं. 

२. सोशल नेटवर्किंग संबंधी झालेल्या संशोधनात एक गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट अशी आहे की सतत सोशल नेटवर्किंगवर वेळ घालवल्यामुळे माणसांच्यातला संयम खूप कमी होतो आहे. नकारात्मक विचारसरणी तयार होऊ लागते. सांगीवांगी गोष्टींवर चटकन भरवसा ठेवण्याची वृत्ती वाढते. समोरच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजसवर आता माणसांची मनःस्थिती अवलंबून असते.  

३. माणसांची विचारपूर्वक बोलण्याची सवय राहिली नाही. खोटं कौतुक करण्याची अकारण रागावण्याची सवय लागते. सतत मूड बदलत राहतात. आपण सुरक्षित नाही असं वाटत राहतं. 

४. शरीराच्या आवश्यक गरजा पुऱ्या करण्यासाठीही या सोशल नेटवर्किंग साईट्सवर अवलंबून राहायला लागतात. याबाबतीत आता कोणताही वयोगट राहिलेला नाही. म्हातारे तर आहेतच पण तरुण आणि आता लहान मुलंही त्यांचं अनुकरण करू लागली आहेत. आता मोठ्यांच्या समस्या लहान मुलांकडे हस्तांतरित होतीलच.     

५. ही सोशल नेटवर्किंगची दुनिया आभासी आहे. इथल्या आभासात आपण हरवून जाताना 

आपणही आभास निर्माण करण्याचा प्रयत्न कळत नकळत करत आहोत. आपलेही अनुयायी म्हणजेच फॉलोअर्स वाढावेत यासाठीही जे नाही ते ही करण्याकडे काळ वाढतो आहे. 

६. आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी केवळ चार भितींमध्ये ठेवायला हव्यात त्याचं ही या समाज माध्यमांवर प्रदर्शन मांडलं जातं आहे.

७. आभासी माध्यमावर संवादही आभासीच होतो आहे, त्यामुळे चुकीचे अर्थ काढले जात आहेत. समजून उमजून संभाषण होताना दिसत नाही. त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक शांतता बिघडून जात आहे. 

८. एकूण काय तर या सोशल नेटवर्किंग साईट्स लोकांना जवळ आणण्याच्या उद्देशाने बनवलेल्या आहेत. पण त्याचा योग्य वापर होताना दिसत नाही कारण त्या वापरण्या संबंधी आचारसंहिताआपल्याला माहित नाहीत हेच दिसून येत आहे.

याचे फायदे तोटे लक्षात घेता सर्वांनी आपल्या या सवयींवर लक्ष देऊन या कशा कमी होतील याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे. नाहीतर भविष्य अंधारात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole