6 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

काश्मीरचा विशेष दर्जा रद्द!

राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून ऐतिहासिक पाऊल सरकारने उचलले आहे. सध्या राज्यात राज्यपाल राजवट असल्याने विधानसभेऐवजी संसदेत हे विधेयक मांडण्यात आले. त्याच्याबरोबरच जम्मू-काश्मीरचे विभाजन होऊन लडाख आणि जम्मू काश्मीर स्वतंत्र दोन केंद्रशासित प्रदेश झाले. राज्यसभेत मंजुरी लोकसभेत शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी.

काश्मीरचा विशेष दर्जा रद्द, what will change in kashmir, 6 August 2019 Current Affairs In Marathi, current affairs in marathi, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360
Source – businesstoday.in

नेमकं काय ?

  • अनुच्छेद 370 पूर्णत: रद्द नाही. त्या मधील उप कलम 1 कायम काश्मिरी रहिवाश्यांचे विशेषधिकार रद्द.
  • जम्मू -काश्मीर मधील आर्थिक दुर्बलांसाठी दहा टक्के आरक्षणही आपोआप लागू.
  • कलम 370 प्रमाणे काश्मीरला लाभलेले सर्व विशेषधिकार रद्द. 35-अ आपोआप रद्द.
  • संपूर्ण देशात एकच राज्यघटना एकच कायदा,स्वतंत्र राज्यघटनेचे काश्मीरचे अस्तित्व संपुष्टात.
  • जम्मू-काश्मीरमधील जनतेला भारत सरकारच्या सर्व योजनांचा लाभ.
  • इतर राज्यातील नागरिकांना मालमत्ता खरेदीचे जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्य.
  • काश्मीरी रहिवाशी भारताचे नागरिक, त्यांचे दुहेरी नागरिकत्व रद्द.
  • जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारला आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी मुभा.
  • विभाजनामुळे लडाख व जम्मू-काश्मीर यांचे प्रशासकीय विभाग वेगवेगळे.
  • लडाख हा नवीन केंद्रशासित प्रदेश पण तिथे विधानसभा नसणार. जम्मू-काश्मीर नव्याने केंद्रशासित प्रदेश, विधानसभा असणार.
  • जम्मू व काश्मीरमधील विधानसभेच्या जागा फेररचना समिती ठरविणार.

प्रशिक्षक निवडणार अंतिम खेळाडू, कब्बडी समितीचा निर्णय.

▪️ महाराष्ट्रातील कबड्डीची गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या प्रशिक्षण समितीच्या पहिली सहविचार सभा पार पडली. यात राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेऊन प्रशिक्षकानेच अंतिम खेळाडू निवडीवा यासाठी त्याला अधिकार देण्याबाबतीत मत मांडले

▪️ नाशिकच्या लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या सहविचार सभेत समिती स्थापन करण्यामागील हेतू स्पष्ट प्रमुख शकुंतला खटावकर यांनी केला.

▪️ राज्यात जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीतून प्रशिक्षण घ्यावे व प्रशिक्षकाला अंतिम खेळाडू निवडण्याची पूर्णपणे मुभा असावी, अशा सूचना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलेजा जैन यांनी केल्या.

▪️ प्रशांत भाबड यांनी यावर काही उपाय सुचविले, प्रशिक्षकांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशी वर्गवारी करून त्याप्रमाणे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण वर्ग चालवणे, त्यांच्या प्रगतीप्रमाने टप्प्याटप्प्याने त्यांना या श्रेणी बहाल करणे, प्रशिक्षणासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन केंद्र तयार करावे.


फलंदाजांचा कर्दनकाळ स्टेनची निवृत्ती.

▪️ फलंदाजांचा कर्दनकाळ वेगवान गोलंदाज डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर.
▪️ कसोटी क्रिकेटमधून स्टेनची निवृत्ती. स्टेनने आतापर्यंत 93 कसोटीत 439 बळी घेतले होते.


दिनविशेष

१९४५: अमेरिकेने जपान मधल्या हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला. पहिल्यांदा इतिहासात अणुबाँबचा वापरण्यात आला.

१९९७: कोलंबोत पार पडलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने भारताविरुद्ध विक्रमी धावसंख्या ६ बाद ९५२ उभारली. त्यात ३४० धावा सनत जयसूर्याने केल्या होत्या.

१९२५: राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole