प्रत्येक महिलेने करायलाच हवेत असे ५ व्यायाम ! फक्त १० मिनिटे काढा आणि स्वत:ला फिट ठेवा

5 Best exercises for every women – व्यायाम करण्याची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही, असा बऱ्याच जणांचा सूर असतो. पुरुष या साठी वेळ काढतात पण महिला वर्गाला याबद्दलचा खास असा वेळ मिळत नाही. कारण स्त्रियांच्या मागे खूपच व्याप असतात. मुलांच्या शाळा, कॉलेज, क्लासेसच्या वेळा सांभाळा, नवरा ऑफिसला जाणार असतो आणि स्वतःलाही जायचं असतं, म्हणून स्वयंपाक करणं, डबे भरणं या सगळ्यात महिला गुरफटून जातात.

म्हणून नोकरदार स्त्रियांना तर अजून वेळ कमी मिळतो. (5 Best exercises for every women) म्हणून स्त्रियांनी व्यायाम करायचा कसा आणि कधी? हा प्रश्नच आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण या लेखातून मिळवूया.

प्रत्येकीने करायलाच पाहिजेत ही ५ आसनं

शिशुआसन

हे आसन केले असता पचनशक्तीमध्ये सुधारणा होते.
ज्यांना वरचेवर बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांना या आसनाचा खूप फायदा होतो.
त्याचबरोबर मनावरील दडपण दूर करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.
कंबरेत वेदना होत असतील तर योग्य प्रकारे ताण देऊन अर्थात स्ट्रेचिंग करून त्रास कमी होतो.

मलासन

खुब्याचे स्नायू मजबुत होण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.
कंबरदुखी पासून मोकळीक देणारे हे आसन आहे.
पोटामध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा त्रास हा मासिक पाळीदरम्यान होत असतो तर तो कमी करण्यासाठी रोज मलासन करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.
गुडघे आणि पायाच्या सांध्यांना मजबुती देण्यासाठी हा व्यायाम हा खूप लाभकारक आहे.

बद्धकोनासन आणि बटरफ्लाय

गर्भाशयासारख्या प्रजनन संस्थेतल्या महत्वाच्या व अन्य अवयवांची ताकद वाढवण्यासाठी हे आसन योग्य आहे.
मांडी आणि नितंबावरील चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूप करते.
या आसनामुळे पचनशक्तीमध्ये खूप सुधारणा होते.
हे आसन नियमितपणे केल्याने मासिक पाळीमध्ये होणारा खूप रक्तस्त्राव किंवा पोटदुखी हा त्रासही कमी होतो.
मेनोपॉज म्हणजेच पाळी जाण्याच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्याही या आसनामुळे कमी होतात.

अधोमुखासन

हे आसन केल्याने होणारा मुख्य फायदा म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
पोटऱ्या, मांड्या, नितंबावरील चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे.
हे आसन केल्याने मेंदूला उत्तमप्रकारे रक्तपुरवठा हाेतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता उत्तम होते.
या आसनाचा सराव केल्याने दंडांवरील चरबी कमी हाेण्यास मदत होते.
हाताच्या आणि पायाच्या सांध्यांना यामुळे खूपच फायदा होतो.

मार्जरासन

महिलांना ज्याचा वरचेवर त्रास जाणवतो ते म्हणजे कंबरदुखी व पाठदुखी. हे त्रास कमी करण्यासाठी हे आसन करायला हवे.
पाठीच्या कण्याला लवचिक बनवण्यासाठी फायदेशीर ठरणारे हे आसन आहे.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हे आसन फारच उपयोगी आहे.

ही आसने करायची म्हणजे यासाठी चांगला तासभराचा वेळ काढावा लागेल असा काही विचार करू नका. तुमच्या वाट्याला जी काही मोजकीच मिनिटे येतात, त्या मिनिटांमध्ये ही आसने आवर्जून करा. दिवसातली काही मिनिटे स्वत:ला द्या आणि हे व्यायाम करा आणि स्वतःला फीत ठेवा.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole