5 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

भारताने केली ‘क्यूआरएसएएम’ क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी.

▪️ भारताने रविवारी (४ ऑगस्ट) दोन क्षेपणास्त्रांची वेगवेगळ्या उंचीवर चाचणी घेतली. यात क्षेपनशास्त्राची वायुगती, रचनात्मक स्थिती, इंधन क्षमता हे घटक योग्यरित्या काम करताना दिसून आले.

▪️ क्षेपणास्त्राची 4 जून 2017 रोजी पहिली चाचणी झाली होती तर त्याच्या दोन चाचण्या 26 फेब्रुवारी 2019 रोजी या एकाच दिवशी यशस्वीपणे घेतल्या होत्या. अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशी यशस्वी चाचणी घेतली. एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी चंदीपूर (ओडिसा) येथे ही चाचणी घेतली.

5 August 2019 Current Affairs In Marathi, current affairs in marathi, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360
Source – Google

▪️ तर संकुल- 3 मधून मोबाइल ट्रकवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारे, जलद प्रतिसाद देणारे, या क्षेपनशास्त्राचा पल्ला 25-30 किलोमीटर आहे.


‘चांद्रयान-२’ कडून पृथ्वीची छायाचित्रे प्रसारित

▪️ इस्रोच्या ‘चांद्रयान २’ या यानाची चंद्राकडे आगेकूच सुरू आहे. या दुसऱ्या चंद्र मोहिमेतील यानाने अवकाशातून पृथ्वीचे छायाचित्र पाठवले आहेत.

▪️ इस्रोच्या यानातील एल १४ या कॅमेऱ्याने छायाचित्र काढली असून पृथ्वी वेगवेगळ्या भागातून कशी दिसते याचे चित्रदर्शन घडते.हि छायाचित्रे ३ ऑगस्ट रोजी पाठवलेले आहेत. मागे काही फोटोग्राफ्स विविध सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले होते पण त्या फोटोशी चांद्रयान २ चा काहीही संबंध नाही असे इस्रोकडून कळविण्यात आले होते.


विनेशला फोगटला सलग तिसरे सुवर्ण

▪️ भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या ५३ किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली.

▪️ २४ वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा ३-२ असा पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला.

▪️ काही दिवसापूर्वी फोगटने स्पेनमध्ये झालेल्या ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

▪️ कुस्तीमध्ये बलाढय़ प्रतिस्पर्धी असेल, तर त्यातून स्वत:च्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा सकारात्मक धडा मिळतो. पोलंड बॉक्सिंग स्पध्रेतील कामगिरीबाबत अतिशय समाधानी आहे. ५३ किलो वजनी गटातील कामगिरी प्रेरणादायी आहे.– विनेश फोगट


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole