4 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय

▪️ देशातील विविध विमानतळावर मोफत वायफाय सेवेनंतर आता देशभरातील तब्बल २००० रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय मिळणार आहे. रेलटेल या रेल्वे प्रशासनच्या सार्वजनिक उपक्रमाच्या योजना राबणाऱ्या कंपनीने पहिल्या टप्प्यात १६०० रेल्वे स्थानकांवर वायफाय जोडणी पूर्ण केली आहे.

▪️ रेलटेलचे अध्यक्ष पुनित चावला यांच्या माहितीनुसार अजमेर (राजस्थान) विभागातील राणा प्रतापनगर रेल्वेस्टेशन हे मोफत वायफाय मिळणारे २००० वे स्टेशन असेल.

▪️ रेल्वे प्रशासन या कामासाठी दिवसरात्र काम करत असून कामाची गती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून अंदाजे दररोज ७४ रेल्वेस्टेशनवर वायफाय जोडणी करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.


ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

▪️ हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील भालचंद्र कोल्हटकर यांचे निधन झाले आहे.

▪️ ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘आपला माणूस’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘एक अलबेला’, ‘उंच भरारी’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनी अभिनयाची छाप पाडली.


आता भारतीय पोस्ट सुरू करणार ‘ई ट्रेडिंग’ सेवा

▪️ ऑनलाइन खरेदीचा प्रतिसाद पाहता भारतीय पोस्टने आपल्यात बदल करत ई ट्रेडिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) २०१६ मध्येच स्थापन करण्यात आले होते आता पोस्टाच्या माध्यमातून या पोर्टलवर खरेदी केलेली वस्तू पोस्टमॅन द्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली जाणार आहे.

▪️ सध्या पोस्टाने प्रायोगिक तत्वावर अंबालामध्ये हि सेवा चालू केली आहे यानंतर अन्य ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. हो सेवा चालू केल्यानंतर पोस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असेही सांगण्यात येत आहे.

▪️ काय सुविधा असतील ?
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन प्रमाणेच वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे विकत घेता येईल. वस्तू खरेदीवर डिलिव्हरी करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. वस्तू खरेदी केल्यानंतर दोष आढळल्यास परत करण्याची सुविधा असणार आहे.


फाळणीच्या ७२ वर्षांनंतर उघडले ऐतिहासिक गुरूद्वार

▪️ महाराजा रणजित सिंग यांनी १८३४ मध्ये उभारलेला ऐतिहासिक छाओ साहेब गुरूद्वारा तब्बल ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने उघडला आहे. पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात हा गुरूद्वारा आहे.

▪️ शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक जोगियन मंदिरात गेले होते तेथून परतत असताना छाओ साहिब गुरूद्वारा ठिकाणी आले. त्यावेळी या परिसरात मोठा दुष्काळ होता. गुरू नानक यांनी येथे थांबून प्रार्थना केली आणि पाण्याची समस्या दूर झाली अशी कथा आहे. यामुळेच हा गुरूद्वारा ऐतिहासिक मानला जातो.


दिनविशेष

१७३० : पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म झाला. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

१८४५ : समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम कायदेपंडित आणि प्रशासक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

१९५६: अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.

१९६१: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

२००१: भारतातील पहिली त्वचा बँक लोकमान्य टिळक रुग्णालयात, मुंबई येथे स्थापन झाली.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.