चालू घडामोडी – 30 December 2020

जगातल्या पहिल्या चित्रपटाला सव्वाशे वर्षे पूर्ण
- फ्रान्सच्या ल्युमिअर बंधू यांनी २८ डिसेंबर १९८९५ रोजी पॅरिसच्या कॅफे मध्ये चलत चित्रांचा पहिला खेळ सादर केला.
- रुळावरून धावणारी आगगाडी स्टेशनमध्ये येत आहे, माळी बागेला पाणी ही एक ते दिड मिनिटांची पहिली चित्रफीत होती.
- जानेवारी १८९६ मध्ये ‘अराईव्हल ऑफ द ट्रेन’ असं नाव असलेला हा दिड मिनिटांचा मूकपट चित्रित केला गेला.
- ७ जुलै १८९६ चित्रपटाचा पहिला मुंबईच्या वॅटसन हॉटेल मध्ये झाला
कोकण किनारी ऑलिव्ह रिडले च्या विणीच्या हंगामाला सुरुवात
- कोकण किनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवाचे यंदाच्या विणीच्या हंगामातले पहिले घरटे सापडले.
- डिसेंबर ते फेब्रुवारी हा या ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम असतो व ते त्यासाठी कोकण किनाऱ्यावर येतात.
- समुद्रातून येऊन किनाऱ्यावर ही कासवे अंडी घालतात, पुन्हा समुद्रावर निघून जातात. यानंतर साधारणतः ५० ते ५५ दिवसांनी त्यामधून कासवाची पिल्ले बाहेर येऊन समुद्रात जातात.
- ऑलिव्ह रिडले प्रजातीचे अस्तित्व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार धोक्यात आलेले आहे.
- वेळास किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन केंद्र’ उभारण्यात आले आहे.
नृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन
- नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
- ते आधी चार्टर्ड अकाऊंटंट होते नंतर त्यांनी भारतीय नृत्य प्रकारांचा अभ्यास सुरु केला.
- ‘सत्रिया डान्सेस ऑफ आसाम’, ‘न्यू डिरेक्शन इन इंडियन डान्स’ या प्रकारची अशी २० पुस्तके त्यांनी लिहिली.
- भरतनाट्यम्, कुचिपुडी, छाहू, कथ्थक, उडीसी या नृत्य प्रकारांवर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे.
- त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात अध्यापन केले आहे.
महाराष्ट्र मेट्रो कारशेड समिती
- मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेड साठी ही तिसरी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
- राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार समितीचे अध्यक्ष असतील.
- त्याचबरोबर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, आयआयटीचे प्राध्यापक, एमएमआरडीए चे व रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी हे या समितीत असणार आहेत.
- मेट्रोचे कारशेड कांजूरला की अन्य कोणत्या ठिकाणी उभे करायचे याचा अभ्यास करून ही समिती सरकारला महिन्याभरात अहवाल देईल.
हाताने बनवल्या जाणाऱ्या मोंपा कागद उद्योगाचे पुनरुज्जीवन
- १००० वर्षे जुन्या असणाऱ्या व वारशाने मिळालेल्या कलात्मक हाताने बनवल्या जाणाऱ्या मोंपा कागदाच्या उद्योग हा नामशेष होत होता
- अरुणाचल प्रदेश मध्ये खास करून तवांग भागात हा उद्योग प्रसिद्ध आहे.
- खादी व ग्रामोद्योग आयोगाने या उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
- तवांगमध्ये या कागदनिर्मितीचा एक नवीन कारखाना उभारला गेला.