चालू घडामोडी- 28 जून 2021

कासवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद

  • गोड्या पाण्यात आढळणारे फिकट पिवळ्या रंगाचे दुर्मिळ अल्बिनो (Albino) भारतीय मृदू काय कासव (Indian flep shell turtle) औंध, पुणे येथे आढळले होते.
  • त्याची आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत नोंद झाली आहे.
  • उमेश वाघेला व राजेंद्र कांबळे यांनी या कासवावर लिहिलेला शोध निबंध नुकताच ‘झुंज प्रिंट्स’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
  • तब्बल ९२ वर्षांनी हे कासव महाराष्ट्रात पुन्हा आढळले आहे.
  • हे कासव गोड्या पाण्याचे स्रोत म्हणजे नदी आणि तलावात आढळते.
  • हे मिश्रहारी आहे. गोगलगाय, पाणवनस्पती, कोलंबी व मासे हे त्याचे मुख्य अन्न आहे.
  • हे कासव फिकट पिवळे असल्याने ओळखणे अवघड आहे.
  • रंग द्रव्याच्या कमतरतेमुळे सजीवांची त्वचा पांढरी किंवा फिकट पिवळसर होते. यालाच अल्बिनिझम म्हणतात.
  • अनुवंशिकता, एखादा आजार, खाण्यात येणाऱ्या अन्नदोषामुळे ही रंगहीनता येऊ शकते.
  • पांढऱ्या रंगामुळे हे जीव शत्रूच्या नजरेत लगेच येत असल्यामुळे ते जास्त काळ जगत नाहीत.

जम्मू- काश्मीरच्या जागा वाढवल्या.

  • सध्या ८३ आमदारांची क्षमता असणाऱ्या जम्मू- काश्मीर (J  & K) विधानसभेत आता अजून ७ मतदारसंघ वाढवण्यात येणार आहेत.
  • जम्मू व काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ च्या पाचव्या भागातील तरतुदींनुसार व परिसीमन कायदा २००२ नुसार जम्मू-काश्मीर परिसीमन आयोग अस्तित्वात आला आहे.
  • याआधी १९९४-९५ मध्ये जम्मू-काश्मीरचं परिसीमन झालेलं होतं. २६ वर्षांनंतर विधानसभेच्या ७६ जागांमध्ये वाढ करून आता ८७ केल्या आहेत.
  • जम्मू काश्मीरच्या ८७ जागा आहेत, त्याचबरोबर लढाखच्या चार जागा आहेत. ज्यांना सहा वर्षांची मर्यादा आहे. बाकी देशात विधानसभेच्या सदस्यांची कार्यकालाची मर्यादा पाच वर्षांची असते.
  • एकूण राज्यात आता १११ जागा असणार आहेत, ज्यात २४ जागा या पाकव्यात काश्मिरातील सदस्यांसाठी आरक्षित किंवा रिकाम्या असतील.
  • ५ ऑगस्ट २०१९ च्या आधी या विधानसभेच्या जागा या जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेनुसार व जम्मू काश्मीर जन प्रतिनिधित्व कायदा १९५७ नुसार ठरवल्या जात होत्या.

महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट किंवा कमलम् हे दुबईला निर्यात

  • सर्वसाधारण नाव – ड्रॅगन फ्रुट किंवा कमलम् (Dragon Fruit)
  • शास्त्रीय नाव – Hylocereusundatus
  • कुठे पिकतं- भारत, मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, अमेरिका, व व्हिएटनाम.
  • भारतात कुठे- तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, प. बंगाल, अंदमान व निकोबार.
  • पिकवण्यासाठी पाण्याचे प्रमाण कमी लागते. कोणत्याही मृदा प्रकारात याचे उत्पादन घेता येऊ शकते.
  • तीन मुख्य प्रकार: पांढरा गर व पिवळी साल, पांढरा गर व गुलाबी साल, लाल गर व लाल साल.
  • जुलै २०२० च्या मन की बात (Mann ki baat) मध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी कच्छ मधील शेतकऱ्यांचे ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले होते.
  • या फळात antioxidants, तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे, क्षार हे घटक असतात. हे फळ पेशींना पोहोचलेली इजा भरून काढते व सूज कमी करते. पचनसंस्था सुधारते.
  • याच्या बाह्यभागावरील काटासदृश्य रचना व पाकळ्या या कमळाशी साधर्म्य दाखवतात म्हणून याला कमलम् असं ही म्हणतात.
  • याच्या निर्यातीची जबाबदारी आपेडा (APEDA) ने घेतली आहे. आपेडा ही कृषी उत्पादने व प्रक्रिया केलेले पदार्थ यांची निर्यात करण्यास प्रोत्साहन करते व त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उच्च गुणवत्ता व बाजारपेठ यांचा विकास करण्याचं कामही करते.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा – २०२१ (World cup of Archery)

  • अभिषेक वर्मा (भारत) याने क्रिस शाफ (अमेरिका) याचा पराभव करून वैयक्तिक कंपौंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • अभिषेकने सलग दुसरे वैयक्तिक विश्वचषक सुवर्णपदक पटकावले. याआधी २०१५ च्या व्रॉकलॉ विश्वचषकात त्याने पदक प्राप्त केले आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा (World shooting championship)

  • भारताच्या सौरभ चौधरी व मनु भाकर या जोडीला ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मी एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात रौप्य पदक मिळाले.
  • अंतिम फेरीत सौरभ -मनू जोडीने रशियाच्या व्हिटालिना बात्साराश्किना व आर्टिम शेर्नोसोव्ह यांचा १२-१६ असा पराभव केला.
  • स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जोडीने अंतिम पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम ३८७ गुण मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole