27 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

डॉ. तात्याराव लहाने यांना शाहू पुरस्कार जाहीर

  • राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा मानाचा सन २०२० चा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने याना देण्यात येणार असल्याचे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरने जाहीर केले.
  • समाज कार्य, समाज प्रबोधन, साहित्य कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार देण्यात येतो.
  • पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र आहे.

आतापर्यन्त पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती

  • भाई माधवराव बागल, व्ही शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गुरु हनुमान, साथी नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमागरज, सुश्री मायावती, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, रँग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे, अण्णा हजारे

डॉ. तात्याराव लहाने

  • डॉ. तात्याराव लहाने हे लातूर जिल्ह्यातील मेकगावचे. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी आपले शिक्षण कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत पूर्ण केले. त्यानंतर मेडिसीन क्षेत्रात त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून १९८१ मध्ये पदवी मिळवली. याच्याही पुढे जात त्यांनी नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी त्याच विद्यापीठातून घेतली.
  • आतापर्यंत १ लाख ४९ हजार+ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  • जे.जे. रुग्णालयात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम
  • महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बीना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्याचे विशेष योगदान आहे.
  • यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण

पुरस्कार

  • ‘सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार’, ‘आठवले पुरस्कार’, ‘मराठवाडा गौरव पुरस्कार’, ‘करवीर जीवन गौरव पुरस्कार’, ‘सर्वोत्कृष्ट समुदाय सेवांसाठी सुवर्णपदक’, ‘उत्कर्ष कार्यकर्ता पुरस्कार’, ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ ‘लातूर गौरव पुरस्कार’, ‘डॉ. मुलाय स्मृती वक्तृत्व पुरस्कार’, ‘डॉ. दलजितसिंग सुवर्णपदक’, ‘लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’, ‘जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड’, ‘बेस्ट डॉक्टर अ‍ॅवॉर्ड’

सन २००८ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला.

स्रोत – पुढारी


स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये भारत जगात ७७वा स्थानी

  • स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) नुकतीच वार्षिक आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार स्वीस नॅशनल बँकेत भारतीयांच्या पैशाचे प्रमाण अगदी कमी ०.०६ टक्के आहे. तर ब्रिटन नागरिकांचे प्रमाण तब्बल २७ टक्के आहे.
  • या आकडेवारीनुसार स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये भारत जगात ७७वा स्थानी पोचला आहे तर ब्रिटन पहिल्या स्थानी आहे. भारतीयांचे स्विस मध्ये पैसे ठेवण्याचे प्रमाण २०१९ मध्ये ५.८ टक्क्यांनी घसरून ०.०६ टक्के झाले आहे.
  • स्वीस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या पहिल्या पाच देशांत ब्रिटन, अमेरिका, वेस्ट इंडीज, फ्रान्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. बँकेतील एकूण पैश्याच्या ५० टक्के पैसे या पाच देशातील नागरिकांचे आहेत.

स्रोत – लोकमत


हत्तींनाही मिळणार मोफत रेशन

  • अन्नाच्या शोधात असलेल्या हत्तीणीचा केरळ मध्ये मृत्यू झाल्यानंतर सरकारवर प्रचंड टीका झाली होती यांनतर करेल सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या हत्तींच्या जेवणाची सोया करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • केरळमधील रेशनच्या दुकानांवर हत्तींसाठी मोफत अन्न मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने तांदूळ (१२० किलो), गहू (१६० किलो), रागी (१२० किलो), गुळ (६ किलो) इ समावेश आहे. हत्तींसाठी रेशन देण्याचा निर्णय घेणारे करेल पहिलेच राज्य आहे.

स्रोत – लोकसत्ता


आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole