चालू घडामोडी- 26 जून 2021

खाद्य तेल डब्यामागे ३५० ₹ नी स्वस्त

  • कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे तेल (Edible Oil) खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत होता.
  • आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेतही तेलाची आवक वाढली आहे.
  • घाऊक बाजारात महिन्याभरात १५ ली डब्याला ३०० ते ३५० ₹ तर किरकोळ बाजारात डब्याला २० – २५ ₹ कमी झाले आहेत.
  • देशात उत्पादित तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आणि आता सोयाबीन व अन्य तेल बियांचा हंगाम सुरू होतो आहे. म्हणून साठवून ठेवलेले तेल व्यापाऱ्यांनी विकण्यास काढले आहे.
  • शेंगदाणा तेलाचे दर बाजारात टिकून आहेत, शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. त्याच बरोबर सूर्यफूल व पाम तेलाचे उत्पादनही राज्यातच होते.
  • मात्र सोयाबीनची अन्य देशांमधून आयात करावी लागते.
  • शेंगदाणा तेलाचं उत्पादन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये होतं.
  • सूर्यफूल तेलाची आयात रशिया व युक्रेन मधून करावी लागते.
  • तर पाम तेला साठी आपण मलेशिया, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड या देशांवर अवलंबून असतो.
  • सोयाबीन तेल हे बहुतेक करून अर्जेंटिना व ब्राझील मधून मागवलं जातं.

कैद्यांचे हक्कही जपले पाहिजेत.

  • तुरुंगांमध्ये कैद्यांची झालेली गर्दी ही त्यांच्याच जीवाला धोकादायक ठरू शकते.
  • माहितीच्या अनुसार, तिहारच्या तुरुंगात ११ वेगवेगळ्या विभागात सध्या १२,७१५ कैदी आहेत. खरंतर तिहारची ७४२५ इतकीच क्षमता आहे.
  • यांत ११०७७ कैदी जे आहेत त्यांच्यावरचा गुन्हा अजून शाबित व्हायचा आहे. खटले चालू आहेत. त्यांना कच्चे कैदी म्हणलं जातं.
  • हे पाहता कैद्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. कारण यामुळे मोठ्या प्रमाणावर कैद्यांना कोरोनाची लागण झाली. आणि त्यापैकी काहींना आपला जीव सोडावा लागला.
  • राज्यघटनेच्या कलम २१ नुसार कैद्यांनाही मिळणारा जगण्याचा मूलभूत अधिकार यांवर गदा येत आहे.

WHO: उत्परीवर्तीत डेल्टा  उपप्रकार प्रबळ ठरण्याची शक्यता

  • कोरोना संक्रमणाचा सध्याचा कल कायम राहिला तर कोरोनाचा अधिक संक्रमित करू शकणारा ‘डेल्टा उपप्रकार’ (Delta plus varient) हा प्रबळ कूळ (Dominant Linge) ठरू शकतो. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
  • आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. आणि अजून बऱ्याच ठिकाणी तो सापडत आहे.
  • जगभरात अल्फा (Alfa) उपप्रकराची १७० देशांमध्ये तर बीटा (Beta) ११९ देशांमध्ये गॅमा (Gamma) ७१ देशांमध्ये तर डेल्टा उपप्रकराची ८५ देशांमध्ये नोंद झाली असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने २२ जून ला जारी केलेल्या ‘Covid 19 weekly epidymiological update’ मध्ये म्हणले आहे.
  • आतापर्यंत ८५ देशांमध्ये आढळलेला हा डेल्टा उपप्रकार WHO च्या सर्व क्षेत्रांमध्ये अजूनही  आढळत असून, त्यापैकी ११ ठिकाणी तो नव्याने आढळला आहे.

जीएसएल येथे दुसऱ्या युद्धनौका तळ बांधणीचा प्रारंभ

  • भारतीय नौदलासाठी दुसऱ्या युद्धनौका तळ बांधणीचा प्रारंभ ‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ येथे नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांच्या हस्ते पार पडला.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे दोन प्रगत युद्धनौकांची बांधणी केली जात आहे.
  • पहिल्या युद्धनौका तळ बाधणीला २९ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात करण्यात आली.
  • पहिली युद्धनौका २०२६ नौदलाला सुपूर्द करण्यात येईल तर त्या नंतर सहा महिन्यांनी दुसरी  सुपूर्द करण्यात येईल.
  • गोवा शिपयार्ड मध्ये बांधण्यात येणाऱ्या युद्धनौका या रशिया बरोबर केलेल्या कारारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वदेशी जहाज बांधणी कार्यक्रमाचा एक भाग आहेत.
  • २५ जानेवारी २०१९ रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात या संदर्भात करार झाला होता.

संमतीशिवाय फायद्यातील सहकारी बँकांचे विलीनीकरण नाही.

  • सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.
  • त्यामुळे जोवर राज्यसरकार एखाद्या बँकेच्या विलीनीकरणाची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे (RBI) करत नाही, तोवर कोणत्याही सहकारी बँकांचे विलीनीकरण होणार नाही. अशी भूमिका सहकार विभागाने घेतली आहे.
  • सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या सद्यःस्थितीची माहिती मागवली आहे.
  • केंद्र सरकारच्या बँकिंग नियमन कायद्याविरोधात राज्यसरकारने दंड थोपटले आहेत.
  • बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये सन २०२० मध्ये केलेल्या सुधारणांचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या बैठकीमध्ये बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणां विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • त्या नंतर सहकार विभागाने ही भूमिका घेतली आहे.
  • त्या सुधारणांचा अभ्यास करून लवकरच अहवाल तयार करण्यात येणार असून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole