चालू घडामोडी – 24 जून 2021

डेल्टा व्हेरिएंट वर लसींचा प्रभाव नाही

  • भारतात उपल्बध कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्टा विरोधात खूप कमी प्रमाणात अँटिबॉडीज् तयार करतात, असं दिसून आलं आहे.
  • सद्य परिस्थितीमध्ये जगभरातील कोरोना लसींपैकी (Corona Vaccine) सर्वच लसी या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावीपणे काम करत नाहीत.
  • डेल्टा व्हेरिएंट किंवा बी १.६१७.२ भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.
  • यु.के.मध्ये सध्या तिसरी लाट आली आहे हे आकडेवारी वरून कळून येत आहे. यासाठी कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जबाबदार आहे.
  • आता या डेल्टा व्हेरिएंट मध्ये उत्परिवर्तन (Mutation) होत आहे व त्याचं रूपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta plus varient) मध्ये होत आहे.

भारत अमेरिका नौदलाचा संयुक्त सराव

  • भारतीय नौदलाच्या (Indian Navy) नौका तेग आणि कोची यांच्या समवेत, पी 81 व मिग 29 के हे अमेरिकी नौदलासोबतच्या (US Navy) संयुक्त सरावात सहभागी होणार आहेत.
  • यांत सहभागी होणारा अमेरिकी युद्धनौकांचा समूह ज्याचं नाव रोनाल्ड रिगॅन आहे.
  • हा समूह २३ – २४ जून ला हिंदी महासागारातून जाणार आहे त्यावेळीच हा दोन युद्धसराव आयोजित केला जाणार आहे.
  • भारतीय युद्धनौकांसोबत भारतीय नौदलातील, वायू दलातील विमाने त्याचबरोबर अमेरिकी लढाऊ विमाने वाहून नेणाऱ्या युद्धनौका, ज्यामध्ये रिगॅन आणि अ‍ॅर्लेय ब्रूक सारख्या नौका, तर गायडेड मिसाईल नष्ट करणाऱ्या नौका यूएसएस हॅलसे व तिकाँदेरोगा, व मिसाईल नी सुसज्ज नौका युएसएस शिलोह यांचा समावेश आहे.

महाबळेश्वरात वटवाघळांच्या प्रजातीत निपाह विषाणू

  • महाबळेश्वरातील एका गुहेत मार्च २०२० मध्ये सापडलेल्या ककही वटवाघळांमध्ये पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV, Pune) मधील शास्त्रज्ञांना निपाह हा विषाणू आढळून आला आहे.
  • माणसांपर्यंत हा विषाणू पोहोचला तर मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. २०१८ मध्ये निपाह विषाणूमुळे (Nipah Virus) हाहाकार उडाला होता.
  • म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला घातक रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्ये ठेवलं आहे.
  • भारतात याआधी चार वेळा निपाह समोर आला आहे. या विषाणूवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. यांत मृत्युदरही खूप असतो. म्हणून हा सर्वाधिक धोकादायक मानला गेला आहे.
  • अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा मृत्युदर १-२% तर निपाहचा मृत्युदर ६५-७०% इतका आहे.
  • २००१ मध्ये ही प.बंगालच्या सिलिगुडी मध्ये निपाह आढळला होता. तर आसामध्येही याचे रुग्ण आढळले होते.
  • निपाह हा विषाणू प्रथमतः मलेशिया मधील निपाह या गावात १९९८ मध्ये आढळून आला होता.
  • बहुतांश वेळा वटवाघळे याचा मुख्य स्रोत आहेत. फळे खाणारी वटवाघळे त्यांनी खाल्लेलं फळ आपण खाल्लं तर याची बाधा होण्याची दाट शक्यता असते.
  • संक्रमित डुक्करे किंवा वटवाघळे यांच्या संपर्कात आल्याने याचा प्रसार होऊ शकतो.

उत्तराखंडमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीच्या औषधांसाठी परवानगी

  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतात, असा महत्वाचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.
  • उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक दवाखाने आहेत. त्यात जवळपास ८०० आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
  • त्यातील ९०% हून अधिक दवाखाने हे अतिशय दुर्गम भागात आहेत.
  • या निर्णयामुळे आरोग्य सुविधांपासून वंचीत राहणाऱ्या दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना योग्य आरोग्य सुविधा मिळतील.
  • आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त ही मोठी घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र डिजिटल सात बाराचा नवा विक्रम

  • २१ जून २०२१ या दिवशी महाराष्ट्रात एकाच दिवसात ७२,७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात बारा व खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले आहेत.
  • या माध्यमातून राज्याला एकाच दिवसात २३ लाख ₹ चा महसूल प्राप्त झाला आहे.
  • यापूर्वी १६ जून २०२१ ला ६२००० उतारे डाऊनलोड करण्यात आले होते.
  • त्यामुळे राज्यसरकारच्या ई-फेरफार प्रकल्पाला यश मिळताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole