चालू घडामोडी – 23 December 2020

बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमांकावर

  • वाघांबरोबर आता बिबट्यांचीही गणना करण्यात आली आहे.
  • स्टेट्स ऑफ लेपर्ड इन इंडिया २०१८ हा अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसिद्ध केला आहे.
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था यांच्यामार्फत हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
  • सर्वात जास्त ३४२१ बिबटे हे मध्यप्रदेश मध्ये आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये १७८३ तर महाराष्ट्रात १६९० इतकी संख्या आहे.
  • महाराष्ट्र याबाबतीत तिसर्‍या क्रमांकावर असला तरी यावर्षी बिबट्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी १७५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

निवडणूक आयोगाने अनिवासी भारतीयांसाठी पोस्टल मतपत्रिकांचा प्रस्ताव मांडला

  • भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय विधी मंत्रालयाला लिहीलेल्या पत्रात अनिवासी भारतीयांसाठी पोस्टल मतपत्रिकांची सुविधा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
  • आसाम, केरळ, पुदूचेरी, तामिळनाडू व प. बंगालमधील येत्या २०२१ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणूकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निवडूक आयोगाचा विचार आहे.
  • यासाठी १९६१च्या निवडणूक नियमांमध्ये बदल करण्यात यावा असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.
  • पोस्टल मतपत्रिका या अनिवासी भारतीय नागरिकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देण्यात/पाठवण्यात येतील म्हणजे त्यांना मतदान करणे सोयीचे ठरेल.
  • ही अंशतः इलेक्ट्रॉनिक सुविधा सध्या सुरक्षा दलात सेवा बजावणार्‍या सैनिक व अन्य व्यक्तींसाठी सेना कायदा १९५० नुसार मदतगार ठरत आहे. याला ETPBS म्हणून ओळखले जाते.

कर्नाटकच्या लोकअदालतीचा विक्रम

  • कर्नाटक मधील उच्च न्यायालय व कर्नाटक राज्य विधी सेवा अधिकार मंडळ यांनी एक नवा विकरम घडवला आहे.
  • १९ डिसेंबर रोजी भरवण्यात आलेल्या महा लोक अदालतीत जवळपास २,६०,००० हून अधिक खटले मिटवले.
  • उच्च न्यायालय सोडून तालुका व जिल्हा न्यायालयांच्याकडे असणार्‍या १२.१७% केसेस आता कमी झाल्या आहेत.
  • वाहन आपघात, भूमी अधिग्रहण व अन्य दिवाणी खटल्यांचा समझोता होताना नुकसान भरपाई म्हणून आलेली एकूण रक्कम ही ₹ ६६९.९५ करोड इतकी आहे.
  • या दोन लाखांहून अधिक केसेस सोडवल्या म्हणून राज्याच्या तिजोरीत जमा झालेली रक्कमच केवळ ४१.४५ इतकी होती.

भारत व्हिएतनाम शिखर संमेलन

  • पंतप्रधान मोदी यांनी व्हिएतनाम चे पंतप्रधान गुएन क्षुआन फुक यांच्या साथीने विडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारे हे संमेलन आयोजित केले होते.
  • शांतता व विकास हा दोन्ही देशांकडून साधला जावा हा एकत्रित येण्याचा उद्देश होता. तसे करार ही दोन्ही देशांकडून झाले. दोन्ही देशांनी आपली रणनीतीपूर्ण भागीदारी जाहीर केली.
  • व्हिएतनाम च्या तटरक्षक दलासाठी जलद वेगाच्या संरक्षक बोटी तयार करण्याचा प्रकल्प ज्याचा खर्च १०० मिलियन अमेरिकी डॉलर्स आहे. टोइओ भारत सरकारच्या मदतीने उभारला जाणार आहे.
  • व्हिएतनामच्या निन्ह थुयान प्रांतातील १.५ अमेरिकी डॉलर्सचे विकास प्रकल्प हे भारताच्या सहाय्याने उभारले जाणार आहेत.
  • भारत व व्हिएतनाम यांची संस्कृती व सांस्कृतिक संबंध यावर आधारित एक विश्वकोश बनवण्याचा द्विपक्षीय प्रकल्प ही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole