चालू घडामोडी – 17 जून 2021

कोविन सक्ती रद्द

  • लसीकरणासाठी कोविनवरून (Covin app) ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
  • त्यामुळे १८ वर्षावरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणीनंतर आता लसीकरण करता येऊ शकते.
  • देशात लसीकरण संथ गतीने सुरू असून ग्रामीण नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
  • २१जून पासून आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारच लस पुरवठा करणार असल्याने लसीकरण व्यापक होण्याची शक्यता आहे.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका १८ – ४४ वयोगटातील  नागरिकांना जास्त बसला.

डेल्टा विषाणूवर कोव्हीशिल्ड प्रभावी

  • भारतात आढळलेल्या डेल्टा या कोरोनाच्या उपप्रकारावर (Delta Strain) फायजर व अस्ट्रा झेनेका च्या लसी परिणामकारक असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलेलं आहे.
  • या लसींच्या दोन मात्रा घेतल्यास डेल्टा विषाणूपासून चांगले संरक्षण मिळते, हे ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
  • ऑक्सफर्ड – अस्ट्राझेनेका लस भारतात कोव्हीशिल्ड (Covishield) या नावाने बनते.
  • या लसीची डेल्टा विषाणूविरोधात ९२% परिणामकारकता आहे तर फायजर / बायोइंटेक लसीची ९६% इतकी परिणाम कारकता आहे.

लसीकरणामुळे पहिला बळी

  • लसीकरण झाल्यानंतर गंभीर ऍलर्जी आल्यामुळे एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
  • याला ऍनाफिलॅक्सिस असं म्हणतात.
  • या व्यक्तीला ८ मार्चला डोस देण्यात आला होता.
  • लसीकरणानंतर होणाऱ्या ३१ प्रकारच्या दुष्परिणामांचा अभ्यास (एईएफआय) एका समिती मार्फत केला जात आहे.
  • या समितीच्या मतानुसार, ऍनाफिलॅक्सिसमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.
  • लसीकरणानंतर काही जणांना ऍलर्जी निर्माण होऊ शकते. तातडीने योग्य उपचार केले की जीव ही वाचू शकतो.

भारत सरकारचं NAFED स्वतः राईस ब्रान तेल बाजारात आणत आहे.

  • राईस ब्रान (Rice bran oil) तेलाचे तब्येतीसाठी खूप फायदे आहेत. यातील ट्रान्सफॅट घटकामुळे कोलेस्टेरॉल ची पातळी कमी होण्यास मदत होते.
  • तसेच यांत महत्वाचे मोनो व पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स हे घटकही मोठ्या प्रमाणावर असतात.
  • हे उत्तम गतिवर्धक आहे त्याच बरोबर याच्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो कारण यांत ई जीवनसत्व मोठया प्रमाणावर आहे.
  • खाद्य तेलातील एक उत्तम पर्याय म्हणून American health association व जागतिक आरोग्य संघटनेने यालाच प्रोत्साहन दिलं आहे.
  • हे राईस ब्रान तेल उत्तम रीतीने हवाबंद करून पॅक केलेले आहे. नंतर गरजेनुसार यांत पोषणमूल्यांचा भरणा वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.
  • FSSAI च्य मतानुसार माणसाला आवश्यक २५ -३०% इतकं जीवनसत्व अ आणि ड यांचं प्रमाण आहे.
  • हे तेल नाफेड स्टोअर्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध होणार आहे.
  • भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था म्हणजे NAFED. (सुरुवात 2 ऑक्टोबर १९५८)

दिल्ली उच्च न्यायालय: प्रक्षोभक भाषणे, रास्ता रोको ही दहशतवादी कृत्ये नाहीत.

  • ईशान्य दिल्ली दंगल प्रकरणात देबांगना कलिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा या विद्यार्थी आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने जमीन दिला व पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
  • प्रक्षोभक भाषणे, रास्ता रोको ही दहशतवादी कृत्ये नाहीत, असे न्यायालयाने नमूद केलं.
  • सरकार विरोधातील आंदोलने, प्रक्षोभक भाषणे, रास्ता रोको, या असामान्य बाबी नाहीत.
  • ही आंदोलने शांततामय व अहिंसक अपेक्षित आहेत.
  • मात्र ती सीमा ओलांडून आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत केलेले कृत्य हे दहशतवादी कृत्य किंवा कट म्हणता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.