चालू घडामोडी – 17 December 2020

महिला हक्क आंदोलनकर्तेच लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याचा निषेध करत आहेत.

  • महाराष्ट्र सरकार लैंगिक अत्यचारविरोधात महाराष्ट्र शक्ती विधेयक २०२० आणू पाहत आहे.
  • या कायद्याअंतर्गत खास न्यायालय व अंमलबजावणीसाठी वेगळी व्यवस्था नेमण्यात येणार आहे.
  • हा अतिकडक व महिलाविरोधी कायदा आहे असं मत मांडून महिला हक्कांसाठी लढणार्‍या महिला अधिवक्त्यांकडूनच विरोध केला जात आहे.
  • हा कायदा आंध्रप्रदेश दिशा कायदा २०१९च्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. पण हा कायदा वकील, कार्यकर्ते, महिला हक्कांसाठी काम करणारे यांच्याशी चर्चा करूनच कायदा संमत करायला हवा.
  • या कायद्यातील १२ वा परिछेद त्यानुसार खोट्या तक्रारी दाखल केलेल्या असतील तरी त्यांना शिक्षा केली जाईल. त्याचबरोबर पुरुषसत्ताक संस्कृतीमधील लोकांचा महिलांबद्दल संशयास्पद दृष्टिकोन अधिक वाढेल.
  • सर्व पुरावे जमा करण्यासाठीचा १५ दिवसांचा अवधी हा पुरेसा नाही, गडबडीने होणारा तपास व खटला यांमुळे अन्याय होण्याची शक्यता आहे, असं विरोध करण्यार्‍यांचं मत आहे.

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

  • कुस्तीक्षेत्रातले दिग्गज व पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले.
  • १९५९ साली पहिल्यांदाच हिंदकेसरी ही कुस्तीस्पर्धा भरवली गेली, त्यात पंजाब केसरी बनता सिंग यांना धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी पहिले हिंदकेसरी होऊन मानाची गदा पटकावली.
  • १९५९ मध्येच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपदही त्यांनी पटकावले.
  • अखिल भारतीय कुस्ती अंजिंक्यपद स्पर्धेत १९५९, १९६२ व १९६५ साली त्यांनी विजेतेपद पटकावले आहे.

सरकारने हस्तकला व जीआय खेळणी यांच्यावरचा दर्जा सुधार चा आदेश उठवला.

  • पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत देशाला एक उत्पादन क्षेत्रातील केंद्रस्थान म्हणून वैश्विक ओळख निर्माण करून द्यायची आहे. त्यात खेळण्यांचा ही समावेश आहे.
  • अंतर्गत व्यापार व उद्योगाची जाहिरात करणारा विभाग (DPIIT) यांनी एक चांगली योजना तयार केली आहे.
  • DPIIT ने अशा कुशल कारागीरांकडून बनवल्या जाणार्‍या वस्तू की जे कारागीर विकास आयुक्तांकडे नोडणीकृत असतील व भारतीय गुणवत्ता मानकाचा परवानाप्राप्त असतील, अशा गोष्टींना सूट दिलेली आहे.
  • त्याच बरोबर DPIIT तर्फे जी उत्पादने विशिष्ट प्रांताची ओळख बनली असतील तर त्यांनाही सूट देण्यात आलेली आहे.

यूनेस्कोतर्फे निर्मितीक्षम अर्थव्यवस्था पुरस्कार सुरू

  • यूनेस्को सारख्या जागतिक स्तरावरील संस्थेने वंगबंधू शेख मुजीबउररहमान निर्मितीक्षम अर्थव्यवस्था पुरस्कार देण्यास सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
  • शेख मुजीबउररहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपिता आहेत.
  • पुढील वर्षी नोव्हेंबर २०२१ पासून पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात होईल.
  • दर दोन वर्षातून एकदा युवा वर्गाकडून घेतल्या जाणार्‍या वैश्विक आर्थिक पुढाकाराबद्दल हा पुरस्कार देण्यात येईल.
  • ५०००० डॉलर्स असं या पुरस्कारचं स्वरूप असेल.
  • हा पुरस्कार म्हणजे सांस्कृतिक कार्यकर्ते व संस्था यांच्या मार्फत घेतला अनोखा पुढाकार की ज्यातून निर्मितीक्षम अर्थव्यवस्थेचा विकास होईल.
  • २०२१ हे वर्ष यूनेस्कोतर्फे ‘शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय निर्मितीक्षम व्यवस्थेसाठीचे वर्षं’ म्हणून घोषित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole