चालू घडामोडी – 15 December 2020

हवामान महत्वाकांक्षा संमेलन २०२० हे आभासी होणार आहे.

  • संयुक्त राष्ट्र, यू. के. व फ्रान्स हे संयुक्तपणे या महत्वाकांक्षा संमेलनाचे आयोजन करणार आहेत.
  • पॅरिस वातावरणीय कराराला ५ वर्षे पूर्ण झाली म्हणून याचं आयोजन केलं जाणार आहे.
  • भारताने पूर्वी जे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण त्या पेक्षा २१% कमी केलं आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेची क्षमता जी २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट्स होती ती २०२० मध्ये ३६ गिगावॅट्स पर्यंत वाढवली आहे.
  • अपारंपरिक ऊर्जेची जास्त क्षमता असणारा भारत जगात चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
  • ती क्षमता २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट्स पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • २०३० पर्यंत ही क्षमता ४५० गिगावॅट्स पर्यंत वाढवण्याची महत्वाकांक्षा ठेवण्यात आली आहे.
  • जागतिक स्तरावर भारताने आंतराष्ट्रीय सौर युती व आंतरराष्ट्रीय आपत्ती(ISA) निवारणाच्या पायाभूत सुविधांसाठीची युती(CDRI) अशा जागतिक संस्था उभ्या केल्या आहेत. सध्या या ISA चे १२१ सभासद देश आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर (NFHS)

  • यांत १७ राज्ये व ५ केंद्र शासित प्रदेशांबद्दलची माहिती पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली.
  • दुसऱ्या टप्प्यातील १२ राज्ये व २ केंद्रशासितप्रदेश यांची माहिती घेण्याची प्रक्रिया कोविडमुळे थांबली होती ते नोव्हेंबर मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आहे व मे २०२१ पर्यंत ती संपेल.
  • या सर्वेक्षणात प्रजननक्षमता, माता व शिशुचे आरोग्य, प्रजननारोग्य, पोषण, ऍनीमिया, नवजात अर्भके व शिशुंचा मृत्युदर व कुटुंब नियोजना बद्दलची माहिती असते.
  • जन्मदर घटला आहे कारण गर्भनिरोधकांचा वापर वाढला आहे.
  • सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांतील १२ ते २३ महिन्यांच्या शिशुंच्या लसीकरणाचे प्रमाण ही खूप वाढले आहे.
  • कुपोषणाचे निर्देशक खूप वाईट आहेत. १८ पैकी ११ राज्यातील मुलांची वाढीची समस्या आहे. १७ राज्यातील मुलांना ऍनीमिया आहे.

अशरफ पटेल यांना वर्षतील सर्वोत्तम सामाजिक उद्योजिका हा पुरस्कार

  • हा पुरस्कार श्वाव फॉउंडेशन व जुविलेंट फॉउंडेशन यांच्या तर्फे दिला जातो.
  • हा पुरस्कार महिला व बाल विकास व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
  • अशरफ पटेल यांचा परिचय प्रवाह व परिवर्तनशील तरुण समूह या संस्थेच्या सह संस्थापक.
  • यूनिसेफ रोसा व त्यांच्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ८ दक्षिण आशियाई देशांतील पौगंडावस्थेतील व्यक्तींवर कोविड १९ झालेला परिणामाची माहिती घेण्यासाठी एक साधन विकसित केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole