चालू घडामोडी- 14 जुलै 2021

लोकसभेचे अ‍ॅप

  • संसदेचे (Parliament) पावसाळी अधिवेशन (Rainy Session) पुढील आठवड्यात १९ जुलै पासून सुरू होणार असून डिजिटायझेशन प्रक्रिये अंतर्गत लोकसभेचे अ‍ॅप (Loksabha App) विकसित केले जाणार आहे.
  • लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
  • या मालिकेत संसदेकडे असलेला १८५४ पासूनचा चर्चांचा ऐतिहासिक ठेवा संसदीय ग्रंथालयाच्या पोर्टल वर खुला केला जाणार आहे.
  • संसदेच्या ग्रंथालयाचे डिजिटायझेशन सुरू असून संसदीय सचिवालयाकडे असलेले सर्व दस्तावेज संसदीय ग्रंथालयाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • यांत तत्कालीन कायदे मंडळापासून (Indian Legislative Council) ते विद्यमान संसदीय दस्तऐवजांचा समावेश असेल.
  • २०१४ पासून या प्रकल्पावर काम सुरू असून आतापर्यंत २५ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

साखर कारखान्यांना प्राप्तीकर भरण्यासाठी नोटीस

  • सरकारने निर्धारित केलेल्या ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापेक्षा (FRP) शेतकऱ्यांना दिलेला अधिकचा दर हा कारखान्यास झालेल्या नफ्यातून देण्यात आल्याचा दावा देशातील आयकर विभागाने राज्यातील साखर उद्योगाला तब्बल ७६०० कोटी ₹ वसुलीच्या नोटिसा धाडल्या आहेत.
  • देशात ऊसाचा रास्त दर आणि किफायतशीर भाव निश्चित करण्याचा कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजेच सन २००५ -०६ पूर्वी राज्यातील मंत्रीमंडळ उपसमितीने निर्धारित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना ऊसाचा दर दिला जात असे.
  • त्यावेळी अधिकाधिक ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक दर देत. सुलीच्या नोटिसा धाडल्या आहेत.

सहा महिन्यांत ८६ वाघांचा मृत्यू

  • भारतात सलग दोन वर्षांपासून वाघांच्या मृत्यूची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे.
  • गेल्या सहा महिन्यांत ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • गेल्या वर्षाच्या तुलनेत देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३% नी वाढ झाली आहे.
  • मागील दोन व्याघ्रगणनांमध्ये वाघांची संख्या वाढलेली दिसत असतानाच मृत्यूच्या वाढणाऱ्या आकडेवारीने वनखात्यासमोर व्याघ्र संरक्षणाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.
  • ‘क्ला’ – Conservation lenses and wildlife ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहेत. या संस्थेकडून वाघांच्या मृत्यूसंदर्भात माहिती संकलित केली जाते.
  • वाघांच्या मृत्यूमध्ये मध्यप्रदेश पहिल्या, महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • ३० जून २०२१ पर्यंत ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुलैमध्ये तीन वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यांत वाघांच्या अवयव जप्तीची नोंद नाही.
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ७२ मृत्यूची नोंद केली आहे. प्राधिकरणाच्या अहवालानुसार पाच किंवा त्याहून अधिक वाघांच्या अवयवांच्या जप्तीची प्रकरणे आहेत.
  • २०२० या वर्षांत वाघांचे ९८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी ५६ मृत्यू हे जून २०२० पर्यंत म्हणजेच पहिल्या सहा महिन्यांतील होते.
  • २०१९ या वर्षांत वाघांच्या मृत्यूची ८४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित

  • दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला आहे. रजनी मक्कल मंद्रम् (Rajini Makkal Mandram) हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे.
  • फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
  • भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच इच्छा नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं.
  • त्यांचा राजकीय पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम्’ किंवा रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम मध्ये रूपांतर करण्यात येईल.

कॅटरपिलर फंगस

  • वैज्ञानिक नाव – ऑफियोकॉर्डिसेप्स सायनेसिस (Ophiocordyceps Sinesis).
  • सामान्य नाव – कॅटरपिलर फंगस (Caterpillar Fungas)
  • स्थानिक नाव – किडा जडी (भारत), यार्सागुंबा (नेपाळ, चीन, तिबेट)
  • या किड्याला हिमालयीन वियाग्रा म्हणून देखील ओळखलं जातं.
  • हा किडा आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. शिवाय फुफ्फुसांच्या उपचारांमध्ये देखील याचा प्रभाव चांगला पहायला मिळतो.
  • हा कीडा तपकिरी रंगाचा असून २ इंच लांब आहे. या किड्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची चव गोड आहे. हा किडा हिमालयीन प्रदेशात ३००० -५००० मी उंचीवर आढळतो.
  • बाजारपेठेत साधारण १००० ₹ त एक अशी किड्याची किंमत आहे.
  • तर किलोनुसार पहायचं तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) हा किडा ८ -९ लाख ₹ ना विकला जातो. म्हणून हा जगातील सर्वात महागडा किडा आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजरात किड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून १९ – २० लाख ₹ / किलो दराने विकल्या जाणाऱ्या या किड्याची किंमत आता ८ – ९ लाख ₹ / किलो पर्यंत पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.