चालू घडामोडी – 14 December 2020

‘नासा’च्या चांद्रवीर समूहात भारतीय वंशाचे राजा जॉन

  • नासा अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या चंद्रावरच्या ‘आर्टेमिस’ नावाच्या मोहिमेसाठी अठरा चंद्रवीरांची निवड केली आहे. त्यात भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरूप्तूऱ चारी यांचा समावेश.
  • ते निवृत अमेरिकी हवाईदल अधिकारी आहेत.
  • २०२४ मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणारी ही ‘आर्टेमिस’ ही मोहीम आहे.

मंगलेश डबराल यांचे निधन

  • हे हिन्दी कवी होते.
  • ‘पहाड पर लालटेन’ (१९८१) हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता. ‘घर का रास्ता’ (१९८८), ‘हम जो देखते है’ (१९९५) हे अन्य कविता संग्रह.
  • कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांनी साहित्य आकादमी पुरस्कार परत केला होता.

टाइमच्या ‘नायक २०२०’ मध्ये राहुल दुबे यांचा समावेश

  • जॉर्ज फ्लॉईड या अमेरिकन नागरिकाचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्यानंतरच्या निदर्शनादरम्यान त्यातील ७० निदर्शकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला म्हणून राहुल दुबे यांचा टाइम नियतकालिकाच्या ‘नायक २०२०’ यादीत समावेश.

आस्ताद देबू यांचे निधन

  • हे एक असे नर्तक होऊन गेले ज्यांनी शास्त्रीय व आधुनिक या दोन्ही नृत्यशैलींची सांगड घालून एक नवीन नृत्यशैली बनवली.
  • १०/१२/२०२० ला कर्करोगाने निधन. नवसारी, गुजरात मध्ये १३/०७/१९४७ ला त्यांचा जन्म.
  • प्रल्हाद दास हे त्यांचे गुरु, त्यांच्याकडे देबू यांनी कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर गुरु ई.के. पणीवकर यांच्याकडे कथकलीचे धडे.
  • कथ्थक व कथकली हे एकत्र करून आधुनिक नृत्यशैली विकसीत केली.
  • ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या सिनेमाचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं. दिग्दर्शक होते ‘एम. एफ. हुसेन’
  • ५ दशके ७० हून अधिक देशांत नृत्य सादरीकरण.
  • पुरस्कार: संगीत नाटक आकादमी (१९९५), पद्मश्री (२००७)

नरेंद्र भिडे यांचे निधन

  • मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध करणारे संगीतकार यांचे निधन.
  • रानभूल, तार्‍यांचे बेट व मुळशी पॅटर्न सारख्या सिनेमांना संगीत दिलं आहे.
  • सरसेनापती हंबीरराव‘ हा शेवटचा सिनेमा ठरला.
  • पुरस्कार झी गौरव, राज्य नाट्य पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार.

महाशरद अ‍ॅप व पोर्टलची शासनाकडून सुरुवात

  • शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे ‘महाशरद’ अॅप व पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
  • दिव्यांग नागरिकांना आवश्यक घटकांची मोफत पूर्तता करणे हा याचा उद्देश आहे.
  • मार्च २०२१ पर्यन्त हे पोर्टल पुर्णपणे कार्यान्वित होईल.
  • २९ लाख दिव्यांग लोकांपर्यंत हे अ‍ॅप पोहोचवणे हे शासनाचं लक्ष आहे.

भारत उझ्बेकिस्तान यांच्यात ९ करारांवर स्वाक्षर्‍या

  • यासाठी झालेल्या आभासी बैठकीत भारताचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ व उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झिमोमेन उपस्थित होते.
  • विविध क्षेत्रात सहकार्याबाबत ९ करार झाले.
  • दहशतवाद्यांची आश्रयस्थाने, निधीचे मार्ग बंद करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.
  • द्विपक्षीय गुंतवणूकीचा करार करण्याबद्दलसुद्धा प्रयत्न सुरू आहेत.

नवीन संसद भवनाची वास्तूचं भूमीपूजन

  • १० डिसेंबर २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
  • यालाच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प म्हणून ओळखलं जातं.
  • टाटा प्रोजेक्टस लि. या कंपनीला बांधकामाचं कंत्राट मिळालं आहे.
  • याचा खर्च: ९७१ कोटी; क्षेत्रफळ: ६४५०० चौ. मी,
  • आसन क्षमता: लोकसभा सदस्य ८८८ (सध्याची ५४३), राज्यसभा ३८४ (सध्याची २४५), मुख्य सभागृहात संयुक्त सत्रावेळी १२२४ खासदार एकत्र बसू शकतील.
  • ही त्रिकोणी आकाराची इमारत असेल व लोकसभेत राष्ट्रीय पक्षी – मोर, राज्यसभेत राष्ट्रीय फूलकमळ व मेन लाऊंज मध्ये राष्ट्रीय वृक्ष वडाचे झाड अशी प्रतीके असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole