13 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

पुण्यासह सहा शहरांची ‘नॉलेज क्लस्टर’ मध्ये निवड :

भारत सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’ (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, चंडीगड, जोधपूर, भुवनेश्वर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या शहरांमध्ये आणि राज्यात अस्तित्वात असलेले विविध संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.

रालोआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांसाठी निश्चित केलेल्या अ‍ॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.

या शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत. दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील 20 प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.


पृथ्वीची सीमा ओलांडून चंद्राकडे 14 ऑगस्टला यान होणार रवाना :

चांद्रयान-2 पृथ्वीची सीमा ओलांडून 14 ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

14 ऑगस्टच्या पहाटे 3.30 मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाईल, याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे संबोधतात.

हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल. या प्रक्रियेनंतर 8 दिवसांत म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल, त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल.

अखेर 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 चंद्रावर उतरेल.

तसेच यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2च्या कक्षेत पाचव्यांदा बदल करण्यात आला होता. इस्रोचे सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क 3 च्या मदतीने हे प्रक्षेपण झाले होते. या यानाचे तीन भाग आहेत ऑर्बिटर, लैंडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान).


नदालचे 35 वे जेतेपद :

राफेल नदालने (स्पेन) डॅनिल मेदवेदेव (रशिया) याचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवत माँट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेच विजेतेपद खेचून आणले.

या विजयासह नदालने नोव्हाक जोकोव्हिचला (33 जेतेपदे) मागे टाकत आपल्या मास्टर्स विजेतेपदांची संख्या 35 वर नेली.

तर आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच हार्डकोर्टवर इतक्या सहजपणे लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने विजेतेपद कायम राखले.


मुकेश अंबानींचा सहा मोठ्या घोषणा :

काश्मीरचा विशेष दर्जा रद्द, what will change in kashmir, 13 August 2019 Current Affairs In Marathi, current affairs in marathi, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360
Source – Google

जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडविली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याचा थेट सामान्यांना फायदा पोहोचवणार आहेत.

14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च रिलायन्स करणार आहे.

तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी जिओ गिगाफायबरची घोषणा करत देशातील 1600 शहरांना सुपरफास्ट इंटरनेट, जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

सिनेमागृहांमध्ये रिलिज होणारा सिनेमा त्याच दिवशी घरबसल्या पाहता येणार आहे. ही सेवा 2020 पासून देण्यात येईल. यामुळे तुम्हाला टॉकीजमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.

अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन असतील. तसेच आयएसडी कॉलिंगचेही दर दहा पटींनी कमी केले आहेत. फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. यावरून व्हिडिओ कॉलिंगही करता येणार आहे. यासाठी जिओ फॉरेव्हर प्लॅन घ्यावा लागणार आहे. यासाठी किती रक्कम आकारणार याबाबत काहीच सांगितलेले नाही.

स्टार्टअप कंपन्यांसाठी क्लाऊड सर्व्हिस मोफत असणार आहे. ही सेवा 1 जानेवारीपासून दिली जाईल. याशिवाय लघू, मध्यम व्यवसाय इंटरनेट आणि अॅप्लीकेशन जोडणीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी यापुढे 1500 रुपये खर्च येणार आहे.


दिनविशेष : 13 ऑगस्ट 2019

  • क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ‘बालकवी‘ यांचा 1890 मध्ये झाला.
  • कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
  • लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा 898 मध्ये झाला.
  • सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole