चालू घडामोडी – 12 जून 2021

राज्यातील प्राचीन वृक्षांना संरक्षण

  • राज्यातील ५० वर्षांपेक्षा जुन्या वृक्षांना ‘प्राचीन वृक्ष’ (Heritage Tree) असे संबोधून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियमात बदल करण्यात येणार आहे.
  • ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना आणि त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
  • या सुधारणांमध्ये वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण ( Compensatory Plantation) मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना , स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, कर्तव्ये, निश्चिती, वृक्ष गणना, वृक्ष लागवडीसाठी सामूहिक जमिनीची निश्चिती, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्ष संरक्षणासाठी पर्यायी विकल्पांचा शोध, वृक्ष व दंडाच्या तरतूदी या ठळक बाबींचा समावेश आहे.
  • राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लागणार आहे.
  • शहरांमधील वाढत्या प्रदूषणाला कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदतच होणार आहे.
  • पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवला जाईल.
  • वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर एक वैधानिक प्राधिकरण स्थापन केले जाईल. प्राधिकरणाची सूचना वेळोवेळी अधिसूचित केली जाईल.
  • वृक्षतज्ज्ञ स्थानिक वृक्ष प्राधिकरणाचा भाग असतील. वृक्षतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्राधिकरण निर्णय घेईल.
  • नगरपरिषदेमध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष हेच मुख्याधिकारी असतील.
  • दर पाच वर्षांनी प्राचीन वृक्षांची गणना आणि संवर्धन होईल.
  • महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण वृक्ष उपकर वापरासाठी मार्गदर्शक सूचना जारी करेल. दंडाची रक्कम वेळोवेळी अधिसूचित केली जाईल. ही रक्कम प्रतिवृक्षास जास्तीत जास्त एक लाख ₹ पर्यंत मर्यादित राहील.

साथरोगांना नियंत्रित करण्यासाठी सतर्कता नकाशा

  • भविष्यातील साथरोगांचा वेध घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी सतर्कता नकाशाची (Hazard Map) ची निर्मिती करण्यात आली आहे.
  • पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (IISER) संशोधन गटाने हा नकाशा तयार केला आहे.
  • यासाठी १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची ४५० शहरे-निमशहरे, प्रवासाची साधने, प्रवाशांचे प्रमाण असे घटक विचारात घेण्यात आले आहेत. यांचा अभ्यास करून कोणत्या शहरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका जास्त आहे, संसर्ग कसा व किती पसरतो याची माहिती होण्यासाठी हा नकाशा विकसित केला आहे.
  • कोरोना संसर्गाने गेले दीड वर्ष जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची साथ येऊ नये, आणि आल्यास ती रोखण्यासाठी काय करता येईल यासाठीच शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत.
  • विषाणू संसर्गाचा उद्रेक देशातील एखाद्या शहरामध्ये झाल्यास त्या शहरातून किती प्रवासी अन्य शहरांत ये जा करतात, त्यावर संसर्गाचे पसरणे अवलंबून आहे.
  • संसर्ग पसरण्यासाठी शहरे भौगोलिक दृष्ट्या किती जवळ आहेत हे महत्वाचे नाही. तर हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गाने जी शहरे मोठ्या प्रमाणात जोडलेली आहेत, त्या शहरांना संसर्गाचा धोका जास्त असतो.
  • प्रवासातून संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. त्याशिवाय विषाणू किती संसर्गजन्य आहे, त्यावरही संसर्गाचे प्रमाण अवलंबून आहे.
  • उपलब्ध झालेल्या विदानुसार हा नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी खास अल्गोरिदम विकसित करावा लागला आहे.
  • आणखी विदा उपलब्ध झाल्यास हा हझार्ड मॅप अजून प्रभावीपणे काम करू शकतो.

तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्के व्याज

  • नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने पीककर्ज उपलब्ध होणार आहे.
  • या निर्णयामुळे राज्य सरकार देत असलेली व्याजदर सवलत तीन टक्के व केंद्र सरकार कडून मिळणारी तीन टक्के या दोन्हींचा एकत्रित फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्पमुदत पिकाकर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याजसवलत देण्यात येते.
  • १ – ३ लाख ₹ या कर्जमर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीककर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास आधीची १% आणि आताची अधिकची २% व्याजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाच प्रकारच्या रोगांचा टोमॅटो पिकावर प्रादुर्भाव

  • टोमॅटो (Tomato) वर येणारे ग्राऊंडनटबड नेक्रोसिस, कुकंबर मोझाक, पॉटी व्हायरस, पोटॅटो व्हायरस एक्स, कॅप्सिकम क्लोरोसिस या रोगांचे विषाणू सापडले आहेत.
  • पिकांवरील सर्व विषाणूंचा प्रसार फुलकिडे, रसशोषक किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्यामुळे होतो.

स्टार बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन

  • डिंको सिंह (Dingko Singh) हे बँकॉक मध्ये १९९८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग (Boxing) मध्ये सुवर्णपदक मिळवणारे पाहिले भारतीय होते.
  • त्यांच्या यशामुळे ईशान्य भारतात बॉक्सिंग लोकप्रिय झाले.
  • मेरी कोम सह अनेक बॉक्सिंगपटूंना त्यांनी प्रेरणा दिली.
  • १९९७ च्या किंग्स कप स्पर्धेत बाजी मारून त्यांनी अपेक्षा उंचावल्या होत्या, मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत संघातून वगळण्यात आलं होतं. यामुळे त्यांनी मद्यसेवन सुरू केलं होतं पण ऐनवेळी त्यांची निवड केली गेली आणि त्यांनी सुवर्णपदक जिंकले.
  • १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी तत्कालीन जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावर असणाऱ्या थाई बॉक्सर प्रागेस सँताया याला पराभूत केल्यामुळे सँतायाच्या समर्थकांनी डिंको यांच्यावर बिअरच्या कॅन्सचा मारा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole