चालू घडामोडी- 12 जुलै 2021

उत्तर प्रदेश लोकसंख्या नियंत्रण विधेयक मसुदा

 • उत्तर प्रदेश लोकसंख्या (नियंत्रण स्थैर्य आणि कल्याण) विधेयक २०२१, (U.P. Population Control Bill 2021)
 • दोन अपत्ये धोरणाचेउल्लंघन करणाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येणार नाही.
 • त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही आणि बढतीही मिळणार नाही. त्याशिवाय कोणत्याही प्रकराचे सरकारी अनुदान घेता येणार नाही, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
 • शाश्वत विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण आणि स्थैर्य आवश्यक आहे, असेही मसुद्यात म्हटले आहे.
 • जे सरकारी नोकर दोन अपत्ये धोरणाचा अवलंब करतील त्यांना संपूर्ण सेवा दोन अतिरिक्त वेतनवाढी आणि १२ महिन्यांची पितृत्व/ मातृत्व रजा पूर्ण वेतन आणि भत्यासह दिली जाईल.
 • त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजनेखाली सरकारकडून मिळणाऱ्या निधीत ३% वाढ केली जाईल.
 • या कायद्याच्या अंमलबाजावणीसाठी राज्य लोकसंख्या निधी स्थापन करण्यात येणार आहे.
 • सर्व माध्यमिक शाळांमध्ये लोकसंख्या नियंत्रण हा सक्तीचा विषय म्हणून सुरू करणे हे सरकारचे कर्तव्य असेल, असेही मसुद्यात म्हणले आहे.

दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ

 • ज्या ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे ते जम्मू-काश्मीर पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य खाते आणि शेर-ए-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कर्मचारी आहेत.
 • घटनेच्या अनुच्छेद ३११ (Article 311 of Indian Constitution) नुसार यांना बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याकडे कारवाई विरोधात केवळ उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
 • दहशतवादी संघटनांसाठी काम करीत असल्याचा आरोप करून जम्मू- काश्मीर प्रशासनाने ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून त्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याची दोन मुलेही आहेत.

वसंत मोरे यांच्या कामाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

पुण्यातील मनसेचे विद्यामान नगरसेवक आणि शहराध्यक्ष वसंत मोरे हे कोरोना बाधित रुग्णासाठी अविरतपणे काम करत आहेत.
त्यांच्या या कामाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल घेण्यात आली असून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद घेण्यात आली.
एक कोविड रुग्णालय सुरू केले. यातून हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले, अनेक जण घरी बरे होऊन गेले.
त्याच दरम्यान गरीब नागरिकांना अन्न, धान्य, बेघर, नागरिकांना तयार जेवणाचे पाकीट देण्याचं काम आजवर केले आहे. या सर्व कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organisation) घेण्यात आली आहे.

भारतीच वंशाची तिसरी महिला अवकाशात

 • व्हर्जिन गॅलेक्टिकच्या (Virgin Galactic) मदतीने भारतीय वंशाच्या सिरिषा बांदला (वय ३४) या आता रविवार ११ जुलै ला अवकाशात झेपावणार आहेत.
 • कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या तिसऱ्या महिला ठरणार आहेत.
 • ‘टू युनिटी’ (Two Unity) या अवकाशयानाच्या मदतीने त्या अवकाशात जाणार असून न्यू मेक्सिको येथून हे उड्डाण होणार आहे.
 • बांदला यांचा या मोहिमेतील अवकाश यात्री म्हणून असणारा क्रमांक ००४ असून संशोधक म्हणून त्या या मोहिमेत सहभागी होत आहेत.

आयुर्वेदाचे भीष्माचार्य डॉ. वॉरिअर यांचे निधन

 • आयुवेद क्षेत्रातील भीष्माचार्य आणि कोट्टकल आर्य वैद्य शाळेचे (Kottakkal Arya Vaidya Sala) व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी. के. वॉरिअर (Dr. P.K. Warrier) यांचे १० जुलै २०२१ रोजी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते.
 • त्यांच्याकडून उपचार घेणाऱ्यांमध्ये देशाच्या माजी राष्ट्रपतींसह भारताचे व परदेशातील माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे.
 • डॉ.वॉरिअर यांना १९९९ मध्ये पद्मश्री, तर २०१० पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.