चालू घडामोडी – 11 जून 2021

पिकांच्या हमीभावात वाढ

  • यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (MSP) वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत विविध पिकांवरील ही एमएसपी ५०-६२% वाढवण्यात आली.
  • तूर व उडीद डाळीच्या एमएसपी मध्ये ३००₹/क्विंटल इतकी वाढ झाली आहे.
  • आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय समितीने हा निर्णय घेतला.
  • २०२१-२२ या पीक वर्षासाठी १४ पिकांच्या हमीभावास केंद्रीय समितीने मंजुरी दिली.
  • ज्वारीला ११८₹/क्विंटल, तर सर्वात जास्त तीळ पिकाला ४५२₹/ क्विंटल वाढ मिळाली आहे.
  • भुईमुगाच्या पिकालाही २७५₹/ क्विंटल भाववाढ देण्यात आली आहे.

बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणा

  • केंद्र सरकारने जून २०२० मध्ये बँकिंग नियमन (सुधारणा) कायदा २०२० संमत केला आहे.
  • या सुधारणांमुळे सहकारावरील राज्यांचे नियंत्रण संपुष्टात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली.
  • नवीन नियमांनुसार  एका जिल्हा किंवा सहकारी बँकेचे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण तसेच नोकरभरती, व्यवस्थापकीय संचालक नेमणूक, अपात्र संचालकांना काढून अन्य व्यक्ती नेमणे, अध्यक्ष बदलणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, बँकेची सभा बोलावणे, कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यास काढणे हे सगळे अधिकार आता रिझर्व्ह बँकेकडे असतील.
  • यामुळे जिल्हा मध्यवर्ती व अन्य सहकारी बँकांचे अस्तिव लवकरच संपुष्टात येणार आहे. 
  • जर का या बँका संपल्या तर सहकार चळवळच संपुष्टात येईल. व पर्यायाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल
  • या मुद्द्यांवर राज्य सरकार केंद्राविरोधात राजकीय व न्यायालयीन लढा उभारणार आहे.

क्वाड देशांकडून लशींचा पुरवठा

  • QUAD देश (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान)  आग्नेय आशियाई देशांना एक अब्ज लशींचा पुरवठा करणार आहेत.
  • क्वाड ची पहिली आभासी बैठक मार्च मध्ये झाली होती.
  • या लशी भारतात तयार करण्यात येणार होत्या पण भारतात तेंव्हा दुसरी लाट होती. त्यामुळे भारताकडून लशी मिळण्याची शक्यता कमी आहे.
  • परिणामी क्वाड देश हे आश्वासन २०२२ पर्यंत तरी पूर्ण करणार का? ही शंका निर्माण झाली आहे.

रेडियो स्फोटांचा शोध लावला.

  • ब्रह्मांडामध्ये आढळणाऱ्या तब्बल ५०० विस्मयकारक स्फोटांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
  • फास्ट रेडिओ बस्ट अर्थात FRB या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्फोटांचा शोध भारतीय व कॅनेडियन या दोन्ही शास्त्रज्ञांनी घेतला.
  • कॅनेडियन हायड्रोजन इंटेन्सिटी मॅपिंग एक्सपेरिमेन्ट व राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (NCRA) शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.
  • विश्वाची निर्मिती व आजचे अस्तित्व म्हणजे लहान मोठ्या स्फोटांची मालिकाच अशा स्फोटांतूनच सूर्यमाला आणि जीवन अस्तित्वात आले.
  • आजपर्यंत या एफआरबी प्रकारातील स्फोटांचा इतक्या मोठ्या संख्येने शोध लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • या रेडिओ स्फोटांची निर्मिती अजून माहीत नाही, त्यांचे वर्तन विस्मयकारक आहे. 
  • २००७ मध्ये पहिल्यांदा अशा स्फोटांचा शोध लागला. आजवर असे १४० स्फोट शोधले गेले आहेत.
  • या अभ्यासातून भविष्यात तारे, आकाशगंगा, पर्यायाने विश्वाच्या निर्मितीसंबंधातली नवी माहिती मिळेल.

कंकणाकृती सूर्यग्रहण

  • २०२१ मधले हे पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) १० जून ला आहे.
  • या वर्षातील पाहिले ग्रहण २६ मे रोजी झालेले चंद्रग्रहण होते.
  • हे सूर्यग्रहण पूर्ण असेल तरी भारतातून ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे.
  • हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या वेळी लडाख व अरुणाचलप्रदेश मधून दिसणार आहे.
  • भारताच्या अन्य भागातून हे दिसणार नाही.
  • कॅनडा, ग्रीनलँड व रशिया मध्ये हे अंगाठीच्या आकारामध्ये म्हणजेच कंकणाकृती रुपात दिसेल.
  • युरोप, उत्तर अमेरिका व उत्तर आशियाच्या काही भागांत अर्धवटपणे दिसणार आहे.

अल्-साल्व्हाडोर ठरला बिटकॉईन स्वीकारणारा पहिला देश

  • क्रिप्टोकरन्सी ‘बिटकॉईन’ (BITCOIN) चा स्वीकार करणारा पहिला देश अल्-साल्व्हाडोर (EL-SALVADOR) ठरला आहे.
  • आजवर कोणत्याच देशाने क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर चलन म्हणून घोषित केले नव्हते.
  • कोणत्याही व्यवहारासाठी बिटकॉईनला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश अल्- साल्व्हाडोर आहे.
  • अल्-साल्व्हाडोर चे अध्यक्ष नाईब बुकेले यांनी बिटकॉईनला अल्-साल्व्हाडोर च्या संसदेमध्ये ८४ मते मिळून मान्यता मिळाली, या संदर्भातले ट्विट केले.
  • यानंतर बिटकॉइनचा भाव ३४३९८ $ च्या वर गेला.
  • देशाचे कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिल्याने बिटकॉईनवर कोणताही भांडवल लाभ कर लादता येणार नाही.
  • क्रिप्टोकरन्सी उद्योजकांना त्वरित देशात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिली जाईल.
  • बिटकॉईन व अमेरिकी डॉलर मधील दर आता स्वतंत्रपणे निश्चित केले जातील.
  • किंमती बिटकॉईन मध्ये नोंदवल्या जाऊ शकतात. डॉलरमध्ये केले जाणारे पेमेंट आता बिटकॉईन मध्ये केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole