चालू घडामोडी – 10 जून 2021

लसवाटपाचे नवे धोरण

  • लसधोरणांनातर लसवाटपाचे नवे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार राज्यांची लोकसंख्या, कोरोनाबाधितांचे प्रमाण लसीकरण मोहिमेतील प्रगती हे निकष निश्चित केले आहेत. लसअपव्यय झाल्यास पुरवठा घाटेल असे केंद्राने संगितले आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी लसीकरण केंद्रावर लशीसाठी साहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मान्यताप्राप्त अहस्तांतरणीय इलेक्ट्रॉनिक व्हाऊचरचा वापरकेला जाणार आहे.
  • खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने कमाल लसशुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार कोव्हिशील्डच्या एका मात्रेसाठी जास्तीतजास्त ७८०₹ कोव्हॅक्सिनसाठी १४१०₹ तर स्पुटनिकसाठी ११४५₹ शुल्क आकारता येईल. ही शुल्क मर्यादा मंगळवार पासून लागू झालेली आहे.
  • उत्पादकांनी जाहीर केलेय किंमतीवर कमाल १५०₹  सेवा शुल्क लावण्याची मुभा खासगी रुग्णालयांना दिली आहे.
  • त्यानुसार उत्पादकांनी जाहीर केलेल्या किंमती, ५% वस्तु व सेवा कर (GST) व १५० ₹ सेवा शुल्क अशी एकत्रित कमाल किंमत प्रत्येक लशीसाठी आरोग्य विभागाने निश्चित केली आहे.
  • नवे दर ८ जून पासून लागू झालेले असून यापेक्षा अधिक दर आकारण्याची मुभा नाही.

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

  • लशींच्या तुटवड्याचा सामना करीत महाराष्ट्राने लसीकरण आघाडी काम ठेवली आहे. पहिली व दुसरी मात्रा मिळून राज्यातील लसींची अडीच कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • त्यानंतर उत्तरप्रदेशात दोन कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तिसर्‍या क्रमांकावर गुजरात आहे.
  • ७ जूनपर्यंतच्या नोंदीनुसार देशात २३,६१,९८,७२६ नागरिकांना लस मात्रा देण्यात आली आहे. पैकी १८,९५,००,७४७ लोकांनी पहिली मात्रा घेतली, तर ४,६६,०२,९७९ लोकांचे दुहेरी लसीकरण पूर्ण झाली आहे.
  • दुहेरी लसीकरणाची आकडेवारी अन्य राज्यांच्या तूलनेत महाराष्ट्राची सर्वाधिक आहे.

कोरोना संसर्गामुळे केस गळती व त्वचा रोग

  • कोरोना विषाणू संसर्ग ज्यांना होऊन गेला आहे. त्यांना नंतर नागिण या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. व केस गळतीची समस्याही उद्भवू शकते.
  • त्याचबरोबर वेगेवेगळे त्वचारोग ही होऊ शकतात. कारण प्रतिकारशक्ती कमजोर झालेली असते.
  • नागिणीचे दोन प्रकार आढळतात, एचएसव्ही१ व एचएसव्ही२. हे प्रकार सिंप्लेक्स या विषाणूमुळे बनलेले आहेत.
  • ओठांच्या ठिकाणी चट्टे पडून दाग पडू शकतात, याला वैद्यकीय भाषेत हर्पिस लाबियासीस म्हणतात.
  • हर्पिस झोस्टर सारखा आजार होऊ शकतो. यात व्हॅरिसेला झोस्टर विषाणूचा प्रादुर्भाव होतो. चट्टे उठतात व वेदनाही होतात. बाकी त्वचारोगांपेक्षा हा झोस्टर प्रकार कोरोनानंतर जास्त पहायला मिळाला आहे.
  • कॅंडीडा बुरशीचे संक्रमण बरे होत आलेल्या रुग्णांना होऊ शकते. औषधांच्या अतिसेवनामुळे ते होतं. जननेद्रियांच्या ठिकाणी काही वेळा चट्टे उठतात, त्याला कॅंडीडायसिस म्हणतात.

सातशे वर्षांच्या शहराला जिल्ह्याचा दर्जा

  • पंजाब राज्यात मलेरकोटला हा नवा जिल्हा निर्माण झाला आहे. राज्यातील २३ व्या जिल्ह्याचे उद्घाटन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले.
  • मलेराकोटलाचे नाव आणि त्याची निर्मिती सूफी शेख सदरुद्दीन सादर ए जहॉं यांनी १४५४ मध्ये केली.
  • हैदर शेख या नावाने प्रसिद्ध शेख सदरुद्दीन अफघाणिस्तानच्या दरबन प्रांतातून आले होते. व ते शेरवी अफघाण जमातीतून होते.
  • लेपल हेनरी ग्रिफीन यांनी आपल्या पुस्तकात ‘राजाज् ऑफ द पंजाब’ मध्ये मलेरचा संबंध राजपूत राजा मलेरसिंह शी जोडला आहे. मलेरसिंह यांनी भूमसी गावाजवळ मलेरगड किल्ला बांधला.
  • सरहिंदचे गवर्नर वजीर खान याने गुरू गोविंदसिंह यांचे पुत्र फतेहसिंह व जोरावरसिंह यांना भिंतीत चिणून मारलं. मलेरकोटचे नवाब शेर मुहाम्मद खान यांनी १७०४ मध्ये या विरोधात आवाज उठवला. त्यांनी ‘हा’ चा नारा दिला. इतिहासात तो ‘हा का नारा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
  • मध्ययुगीन काळापासून भारतीय-इराणी वास्तूकलेचे नमुने इथे आहेत.
  • सुमारे ६०% जनता मुस्लिम आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.