चालू घडामोडी – 10 जुलै 2021

आयातीऐवजी तस्करीद्वारे सुपारी भारतात

 • विदेशातून भारतात सुपारीची आयात केल्यास मूळ किंमतीच्या १०३% सीमाशुल्क भरावे लागते.
 • एवढ्या मोठ्या प्रमाणात विदेशी सुपारी आयात केल्यास ती महागडी ठरते.
 • त्यामुले नागपुरातील सुपारी विक्रेते इंडोनेशियातून स्वस्त दरात सडलेली सुपारी विकत घेऊन म्यानमार व श्रीलंका अशा दोन मार्गाने भारतात आणतात.
 • देशातील सुपारीची सर्वात मोठी बाजारपेठ नागपुरात आहे.
 • यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड आदी राज्यांमध्ये सुपारी विकण्यात येते.
 • ही सुपारी इंडोनेशिया येथून तस्करी द्वारे नागपुरात आणून सल्फर डायऑक्साईड च्या भट्टीत भाजण्यात येते. त्यानंतर त्याचे कात्रण व इतर प्रकारे त्याची विक्री करण्यात येते.
 • यांत मोठ्या प्रमाणात सरकारी महसूल बुडवला जातो.
 • हा प्रकार अनेक वर्षांपासून आहे. या तस्करी मार्गाने रोज १०० ट्रक सुपारी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते.
 • या माध्यमातून १०३ % सीमाशुल्क बुडवले गेल्यास वर्षाला किमान ५०० कोटी ₹ चा सरकारचा महसूल बुडत असल्याची माहिती समोर येत आहे.
 • श्रीलंकेत उत्पादित केलेल्या वस्तूंना भारतात सीमाशुल्क लागत नाही. त्यामुळे नागपुरातील तस्कर इंडोनेशयाची सुपारी म्यानमारवरून समुद्रामार्गे श्रीलंकेत नेतात.
 • त्या ठिकाणी सुपारी अनेक दिवस साठवून ठेवण्यात येते. त्यानंतर ही सुपारी श्रीलंका निर्मित असल्याचे दाखवून भारतात आणण्यात येते.
 • मात्र नागपूर व गोंदियात सापडलेल्या शेकडो टॅन सुपारीच्या दस्ताऐवजावरून हा प्रकार समोर आला.
 • इंडोनेशियातून निघालेल्या सुपारीचा सिंगापूर,थायलंड, म्यानमार, मणिपूर, सिलचर, गुवाहाटी आणि नागपूर, या मार्गाने तस्करी करण्यात येते. त्याशिवाय सिंगापूर, म्यानमार, श्रीलंका, मुंबई, नागपूर, या मार्गाचाही वापर करण्यात येतो.
 • सुपारी तस्करीसाठी समुद्रमार्ग व भारतात ट्रक द्वारे रस्ता मार्ग वापरला जातो.

केंद्राची घोषणा : आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी २३००० कोटी ₹

 • आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य सुविधांची सुसज्जता’ या योजनेअंतर्गत केंद्राकडून १५००० कोटी ₹ व राज्यांकडून ८,१२३ कोटी ₹ तरतूद करण्यात येत आहे.
 • पुढील ९ महिन्यांमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ हजार कोटी ₹ देण्यात आले होते.
 • देशातील ७३६ जिल्ह्यांमध्ये बाल आरोग्य सेवा केंद्रे, या केंद्रांमधील अतिदक्षता विभागात दूरसंचार माध्यमातून आरोग्य सेवा.
 • सरकारी रुग्णालयांमध्ये २,४४,००० अतिरिक्त खाटा
 • अतिदक्षता विभागामध्ये २० हजार अतिरिक्त खाटांची सुविधा, त्यातील २० % खाटा लहान मुलांसाठी राखीव.
 • ५००० खाटांची सुविधा असलेल्या रुग्णालयांची उभारणी, ८८०० रुग्णवाहिकांचा पुरवठा.
 • वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थी, निवासी डॉक्टर, B.Sc. Nursing चे विदयार्थी आदींनाही कोरोना सेवेत सहभागी करून घेणार.
 • जिल्हास्तरावर कोरोनासंदर्भातील औषधांचा राखीव साठा.

भौगोलिक मानांकन प्राप्त मदुराईची मल्ली आणि अन्य फुले दुबई व अमेरिकेला रवाना

 • परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांना घरातील, मंदिरातील देवाच्या पूजेसाठी ताजी फुले हवी असतात. यासाठीच भौगोलिक मानांकन प्राप्त मदुराईची मल्ली (Madurai Jasmin) म्हणजेच जाई-चमेलीची फुले व अन्य पारंपरिक फुले उदा. लिली, छोटा गुलाब, झेंडू व शेवंती ही फुले ८ जुलै ला दुबई आणि अमेरिकेत निर्यात करण्यात आली.
 • जाई- चमेली (Jasminum Officinale)हे जगभर प्रसिद्ध असणारे फुल आहे.
 • चमेली-जाई ची फुले मदुराईच्या मीनाक्षी मंदिराची शोभा वाढवतात.
 • मदुराई हे शहर चमेली फुलांची मोठी बाजारपेठ बनत आहे.
 • त्याची इतकी प्रसिद्धी होत आहे की या शहराला ‘भारताची चमेली राजधानी’ (Jasmin Capital Of India) म्हणून प्रसिद्ध होत आहे.

आसाम सरकारने गोधन संरक्षण कायदा मंजूर

 • आसाम गोधन संरक्षण कायदा २०२१ (Assam Cattle Preservation Act 2021) हा आसाम विधानसभेच्या सत्राआधी मंजूर करण्यात आला.
 • याआधीच्या गोधन जतन कायदा १९५० या कायद्याला आता बदललं जाणार आहे. नवीन कायद्यानुसार १४ वर्षावरील गोधनाच्या कत्तलीसाठी संबंधित स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल.
 • मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनी सांगितलं की गोधनाची राज्यातील ने- आण यांवर राज्यसरकारने बंदी घातली आहे. आणि बंगलादेशात गोमांसाची तस्करी होते का यांवर लक्ष असणार आहे.
 • जिथे हिंदू राहत असतील तिथे बीफ (Beef) खाल्लं जाणार नाही, असं त्यांनी विधानसभेला सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.