चालू घडामोडी – 9 जून 2021

सर्वांना मोफत लस

  • देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. हे नवे धोरण २१ जून पासून लागू होणार आहे.
  • संपूर्ण लस ही केंद्राकडूनच खरेदी केली जाईल. त्यामुळे लसीकरणाच्या ओझ्यातून राज्यांची मुक्तता झाली आहे.
  • केंद्राच्या लसीकरणाच्या दुहेरी धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे आणि राज्यांच्या वाढत्या दबावानंतर केंद्राने ‘एक देश एक लसीकरण’ हे धोरण स्विकारले.
  • लसनिर्मितीपैकी ७५% लसमात्रा केंद्रसरकार उत्पादकांकडून खरेदी करेल व राज्यांना देईल. उर्वरित २५% लसमात्रा खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून खरेदी  करता येईल.
  • संविधानात आरोग्य हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असल्याने कोरोनासंदर्भातील धोरण व नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना का दिले जात नाहीत, अशी विचारणा झाल्याने केंद्राने हा विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला. व १ मे पासून लसीकरणाची जबाबदारी राज्यांकडे सुपूर्त केली गेली.
  • पण जगाभरातील लशींच्या उपलब्धतेची माहिती राज्यांना समजली, लसीकरणातील अडचणीतील त्यांना जाणीव झाली. म्हणून त्यांनी केंद्राने पुन्हा मागणी केली.
  • नवीन धोरण: लसीच्या किमतीसह फक्त १५०₹ सेवा शुल्क घेण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांत  तुलनेने स्वस्तात लसीकरण केले जाईल.
  • आता या रुग्णालयांकडून १५००-१८०० ₹ शुल्क आकारले जाते पण आता नव्या धोरणामुळे या नफेखोरीवर अंकुश बसणार आहे.
  • डिसेंबर २०२१ पर्यन्त देशात संपूर्ण लसीकरण केले जाईल, असं सरकारनं सांगितलं आहे.

न्यायालयातील प्रक्षेपण पाहण्यासाठी नियम

  • सर्वोच्च वा उच्च न्यायालयांमधील सुनावणीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live telecast) नागरिकांना पुढील काळात पाहता येऊ शकेल, याबाबत न्या.चंद्रचूड यांच्या ई-समितीने हा प्रारूप नियमांचा मसूदा जाहीर केला. सुनावणी अधिक पारदर्शी बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
  • सुनावणीशी निगडीत व्यक्तींच्या मनातील साशंकता टाळण्यासाठी सुनावणीच्या कामकाज पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गेले काही महिने चर्चा सुरू आहे.
  • न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय विधी मंत्रालय प्रयत्न करत आहे.
  • न्यायालयातील थेट प्रक्षेपणाची सुविधा कायद्याचुल्या दृष्टीनेही विचारात घ्यावी लागणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीने प्रारूप नियमांचा मसुदा उच्च न्यायालयांच्या सर्व न्यायाधीशांना पाठवला असून सूचना मागवल्या आहेत.
  • अनुच्छेद २१ नुसार प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर न्यायालयातील कामकाजाची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे.
  • थेट प्रक्षेपण करताना संभाव्य मर्यादांचाही विचार केला जाणार आहे.
  • प्रारूप नियमांच्या मसुद्यात याचिककर्त्याचे खासगी-वैयक्तिक आयुष्य, साक्षीदारांबाबत गुप्तता या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • लग्नासंबंधीचे वाद, महिला/अल्पवयीन मुलांविरोधात लैंगिक अत्याचाराची प्रकरणे,बंद खोलीत होणारी सुनावणी यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.

ISRO ने तयार केली श्वसनयंत्रे

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने तीन प्रकारचे (ventilators) श्वसनयंत्रे तयार केली आहेत.
  • त्याचबरोबर वैद्यकीय वापरासाठी त्या श्वसनयंत्रांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची इसरोची इच्छा आहे.
  • प्राण- (Programmable Respiratory Assistance for the Needy Aid) हे स्वस्त आणि सहज हातातून नेता येण्याजोगं असं श्वसनयंत्र आहे.
  • अंबु- (Artificial Manual Breathing unit)
  • वरील प्राण आणि अंबु ही दोन्हीही यंत्रे अत्याधुनिक आहेत.
  • यांत हवा दाब संवेदक (Sensor), प्रवाह संवेदक, प्राणवायू  संवेदक आहेत.
  • पीप- (Positive End Expiratory Pressure) यांत नियंत्रण झडपांचा समावेश आहे.
  • श्वसनयंत्रांच्या मदतीने रुग्णाला लागेल तेवढाच ऑक्सिजन पुरवला जातो. ऑक्सिजनयुक्त हवा रुग्णाच्या फुप्पूसात सोडली जाते, पण याचे योग्य प्रमाण आवश्यक आहे.
  • वायू- (Ventilation assist Unit) अतिदक्षता विभागात याचा वापर करता येतो. रोगजंतू विरहीत हवा रुग्णाला दिली  जाते. उच्च दाबाच्या ऑक्सिजन स्त्रोताशी हे जोडलेलं असतं. यांतील ऑक्सिजन मीटर हा स्वयंचलित रुग्णाला लागणारा ऑक्सिजन स्वतः नियंत्रित करतो.

कोरोनाचे आणखी एक उत्परिवर्तन (Mutation)

  • ब्रिटन व ब्राझीलमधून आलेल्या प्रवाशांच्या स्वॅबमधून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध लागला आहे. बी.१.१.२८.२ हा तो नवीन विषाणू आहे.
  • जनुकीय क्रमवारी (Genome Sequencing) निश्चित करताना राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (NIV) याचा शोध लागला.
  • या विषाणूमुळे रुग्णाचे वजन कमी होत असल्याचे आढळून आले आहे. याचा अभ्यास सीरियन हॅमस्टर प्ररुपाच्या साहाय्याने करण्यात आला.
  • नवीन विषाणू हा डेल्टासारखाच असून तो अल्फापेक्षा घातक आहे. हॅमस्टर्स वरील प्रयोगात बी १.१.२८.२ विषाणूचा वापर करण्यात आला असता त्यांच्यात या विषाणूंची संख्या सहापटीने अधिक दिसते.
  • हा विषाणू सहजपणे वेगळा काढता येतो, त्याची जनुकीय क्रमवारी निश्चित करता येते.
  • हा विषाणू बी.१ प्रकारातील अन्य विषाणूंपेक्षाही जास्त घातक आहे. तो अधिक गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया निर्माण करतो.

मुंबईच्या कस्तुरबामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण

  • कोरोनाचे उत्परिवर्तन व संभाव्य परिणाम वेळीच रोखण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात जनुकीय क्रमनिर्धारण (Genome Sequencing) करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
  • कोरोना विषाणूची विविध उत्परिवर्तीत रूपे दक्षिण आफ्रिका, भारत, ब्रिटन, ब्राझीलमध्ये आढळली आहेत.
  • या उत्परिवर्तनामुळेच दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती.
  • कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही याचे निदान करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाते. पण हा संसर्ग कोरोनाच्या उत्परिवर्तीत रुपामुळेच झाला आहे हे तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण ही प्रगत चाचणी करणं आवश्यक असते.
  • याआधी हे क्रमनिर्धारण केवळ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे इथंच केलं जातं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.