चालू घडामोडी – 09 जूलै 2021

दिलीप कुमार यांचे निधन
- जन्म: ११ डिसेंबर १९२२, पेशावर,
- मृत्यू: ७ जुलै २०२१, हिंदुजा रुग्णालय, मुंबई
- मूळ नाव: मुहम्मद युसूफ खान.
- हिंदी चित्रपट सृष्टीत ‘ट्रॅजेडी किंग’ (Tragedy King) अशी ओळख.
- बॉलीवूड मध्ये येण्याआधीच त्यांनी आपलं नाव दिलीप कुमार केलं होतं.
- ज्वार भाटा या सिनेमात देविका राणीने मोहम्मद युसूफ खान यांना नायकाची भूमिका दिली. पडद्यावर नाव दिलीप कुमार ठेवण्यास सुचवलं. तेंव्हापासून दिलीप कुमार हे नाव रूढ झालं.
- पलमोनोलिजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी पहिल्यांदा त्यांच्या निधनाची बातमी दिली.
- दिलीप कुमार यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आलं होतं. त्यांचं पार्थिव ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवण्याआधी त्यांना Guard of honor देण्यात आलं.
- कँटीन ठेकेदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी ते कँटीन व सेना क्लब या दोन्ही ठिकाणांचं काम पहायचे. तेंव्हा त्यांना ३६ ₹ पगार मिळायचा.
- दिलीप कुमार राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना १९९४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं. पाकिस्तानातील सर्वात मोठा पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ ने ही सन्मानित करण्यात आले. दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम नोंदवला आहे.
- फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात १९५३ मध्ये झाली. पहिल्याच वर्षी ‘दाग’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढील ३० वर्षांत तब्बल सात वेळा या पुरस्कारावर नाव कोरले.
- दिलीप कुमार यांच्यासाठी सर्वाधिक गाणी मुहम्मद रफी यांनी गायली. १९७४ मध्ये ‘सगीना’ चित्रपटातील ‘साला मैं तो साहाब बन गया’ हे किशोर कुमार यांनी दिलीप कुमार गायलेले गाणे खूप गाजले.
- फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त चित्रपट: दाग (१९५३), आझाद (१९५५), देवदास (१९५६), नया दौर (१९५७), कोहिनूर (१९६०), लीडर (१९६४), राम और श्याम (१९६७), शक्ती (१९८२).
केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असून १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत.
- केंद्रीय मंत्रीमंडळात पहिले सहकारमंत्री पद ‘अमित शहा’ यांना मिळाले असून त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
- केंद्रीयमंत्री पदी बढती मिळालेले मनसुख मांडवीय हे नवे आरोग्यमंत्री असतील.
- माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री असतील.
- अनुराग ठाकूर यांच्याकडे प्रकाश जावडेकर यांचे ‘माहिती व प्रसारण’ मंत्रालय देण्यात आले आहे. त्याचबरोबर ते क्रीडा खात्याचेही केंद्रीय मंत्री असतील.
- रवीशंकर प्रसाद यांचे न्याय / विधी मंत्रालय किरण रिजिजू यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रसाद यांच्याकडचे माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार खाते अश्विनी वैष्णव यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
- वैष्णव यांच्याकडे आधी पियुष गोयल यांच्याकडे असणारे रेल्वे मंत्रालय ही दिले आहे.
- कौशल्यविकास मंत्रालय आता धर्मेंद्र प्रधान सांभाळतील, आधी या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान होते.
- वाणिज्य उद्योग व नागरी पुरवठा मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. राम विलास पासवान यांच्या निधनानंतर नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी गोयल यांच्याकडेच आहे.
- आता वस्त्रोद्योग खातेही गोयल यांच्याकडेच देण्यात आले आहे.
- आता स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण मंत्रालयाचीच जबाबदारी असेल.
- ज्योतिरादित्य शिंदे हे नवे नागरी उड्डाण मंत्री असतील. या खात्याची जबाबदारी आधी ज्यांच्याकडे होती ते हरदीपसिंह पुरी आता पेट्रोलियम खात्याचे मंत्री असतील.
- अरविंद सावंत यांच्याकडील अवजड उद्योग खाते आता डॉ. महेंद्रनाथ पांडे यांना देण्यात आले आहे. या खात्याची अतिरिक्त जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्याकडे होती.
- त्याच्याकडील नगरबांधणी व गृहविकास मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.
- मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्य मंत्रालयासह रसायने व खते, मंत्रालयाचाही पदभार आहे. मांडविया पूर्वी या खात्याचे राज्यमंत्री होते.
- राजनाथ सिंह- संरक्षण,
- नितीन गडकरी- रस्ते व राष्ट्रीय महामार्ग
- निर्मला सीतारामन – अर्थमंत्री
- नरेंद्र सिंह तोमर- कृषी
- एस. जयशंकर- परराष्ट्र
- प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज, कोळसा व खनिज.
- मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक
- गिरीराज सिंह – ग्रामविकास व पंचायती राज
- गजेंद्रसिंह शेखावत- जलशक्ती
- अर्जुन मुंडा- आदिवासी कल्याण, या केंद्रीय मंत्र्यांची खाती कायम ठेवली गेली आहेत.
- जी. किशन रेड्डी- आधी केंद्रीय गृहराज्यमंत्री; आता सांस्कृतिक व पर्यटन मंत्री व ईशान्येकडील राज्यांच्या विकासाची जबाबदारी.
- मोदी यांच्याकडे आस्थापन, ग्राहक तक्रार निवारण, कार्मिक, अणुऊर्जा, सार्वजनिक महत्वाचे विषय व वाटप न झालेल्या मंत्रालयांची जबाबदारी असेल.
- नव्या मंत्रीमंडळात ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व ४ अपना दल, जनता दल(संयुक्त), लोजप, रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत.
- हे मंत्रीमंडळ आधीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
- आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उत्तरप्रदेश ला सर्वाधिक ७, महाराष्ट्राला चार नवी मंत्रीपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
- महाराष्ट्राचे अजून ४ जण म्हणजे कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार व नारायण राणे यांना शपथ देण्यात आली.
बासमातीच्या लागवडीत घट
- आधारभूत किंमत कमी झाल्यास लागवडीचे प्रमाण कमी
- केंद्रसरकारने बासमती तांदळाची न्यूनतम आधारभूत किंमत (MSP) प्रतिक्विंटल १८०० ₹ इतकी निश्चित केली आहे.
- गेल्या वर्षी बासमतीची आधारभूत किंमत २००० – २४०० ₹ ठरवण्यात आली होती.
- बासमतीच्या बियाणांना असलेल्या मागणीत घट झाल्यामुळे पुढील वर्षी बासमतीच्या उत्पादनातही घट होणार असल्याचे स्पष्ट झाले.
- भारतातून दरवर्षी २५ – ३० हजार कोटी ₹ चा तांदूळ दरवर्षी परदेशात निर्यात केला जातो.
- बासमती तांदळाला ‘King Of Rice’ असं म्हणलं जातं.
- भारतीय बासमतीचा विशेष प्रकारचा सुगंध आणि स्वादामुळे जगभरातून त्याला मागणी आली आहे.
- मात्र, आधारभूत किंमत घटल्याने बासमतीची लागवड यंदा कमी झाल्याने उत्पादनही कमी होत आहे.
- पंजाब, हरयाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली तसेच उत्तरप्रदेश पश्चिमी भागात बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
- बासमतीच्या उत्पादनासाठी पाणी हवामान, माती, धान (बीज) महत्वाचे ठरते.
- गंगा नदीचे किनारे आणि पाण्यामुळे बासमतीचे उत्पादन उत्तरेकडे चांगले होते.
- बासमती तांदळाच्या लागवडीस चार महिने लागतात.
नितीन गडकरी खादी प्राकृतिक रंगाचे Brand Ambassador
- खादी प्राकृतिक रंग (Khadi Prakrutik Paint) हा भारतातील पहिला असा रंग आहे जो गाईच्या शेणापासून बनतो.
- याचा नवीन कारखाना जयपूर कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेच्या (KNHPI) आवारात बांधण्यात आला, हे खादी व ग्रामोद्योग आयोगाचा (KVIC) भाग आहे.
- १२ जानेवरी २०२१ ला नितीन गडकरी यांनी हा रंग लाँच करण्यात आला.
- तो दोन भिन्न प्रकारात उपलब्ध आहे, डिस्टेम्पेर (Distemper), इमल्शन(Emulsion),
- खादी प्राकृतिक पेंटचे ‘अष्टलाभ’ सांगितले आहेत, म्हणजे आठ प्रकारचे फायदे आहेत, जीवाणू विरोधी (Anti Bacterial) बुरशी विरोधी (Anti Fungal), नैसर्गिक उष्णता पृथक गुणधर्म आहेत. तसेच हा रंग इको-फ्रेंडली, बिन विषारी, वासरहित, स्वस्त आहे.