चालू घडामोडी – 7 जून 2021

Twitter ला केंद्राचा अखेरचा इशारा

  • भारतातील नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार खास अधिकारी नेमावेत, असा नियम असताना ही तीन महीने टाळाटाळ केल्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला अखेरची नोटीस बजावली आहे व फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
  • नव्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केल्या आहेत त्यानुसार समाजमाध्यम कंपन्यांना २६ मे पर्यन्त निवासी तक्रार निवारण अधिकारी, विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करावी असा नियम आहे. परंतु सतत सूचना देऊनही ट्विटरने या सूचनांचं पालन करण्यास नकार दिला.
  • नियमांचे पालन केले नाही तर आयटी कायद्यानुसार ट्विटरला दायीत्वातून देण्यात आलेली सवलत गमवावी लागेल.
  • भारतातील नागरिकांना आपल्या व्यासपीठावर सुरक्षितता देण्याचा प्रयत्न ट्विटर करत नाही, ट्विटरची बांधिलकी असल्याचंही दिसून येत नाही.
  • ट्विटर भारतात गेल्या १० ते १२ वर्षांपासून काम करत आहे, पण भारतीय नागरिकांच्या तक्रारी ठराविक काळामध्ये व पारदर्शकपाने दूर करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्यास ठाम नकार दिला ही बाब न पटणारी आहे, असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हंटलं आहे.

वाघांच्या संचारक्षेत्राचा विस्तार

  • भारतातील वाघांचे (tigers) संचारक्षेत्र आता फक्त जंगलापुरतेच सीमित न राहता वाघांनी आपले क्षेत्र विस्तारले आहे. खासकरून विदर्भातले ग्रामीण क्षेत्र त्यांच्या हालचाळीसाठी अनुकूल ठरले आहे.
  • सुमारे ३७०६७ चौ.किमी. क्षेत्राच्या रक्षणाचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे. कारण एकूण ९७३२१ चौ.किमी. पैकी हे ३७०६७ चौ.किमी. क्षेत्र हे वाघांचे भ्रमण क्षेत्र आहे.
  • विदर्भातील जमीनीवरील वाघांचे भ्रमणमार्ग यांवर भारतीय वन्यजीव संस्था व महाराष्ट्र वनखात्याने एकत्रितपणे हा अभ्यास केला आहे.
  • या अभ्यासातून मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन, भ्रमणमार्गांचे संरक्षण इ. वर वनखात्याने अधिक जागरूक राहून लक्ष देण्याची गरज आहे असं लक्षात येतं.
  • विदर्भातील वाघ हे संरक्षित क्षेत्राबाहेरील क्षेत्र वापरत आहेत म्हणून वाघ आणि माणूस यांचा संघर्ष वाढतो आहे. कृषि जमिनीवर वाघांच्या हालचाली होत आहेत. इथले ८४२०२ चौ.किमीचे रस्ते विस्कळीत झाले आहेत. म्हणून वाघ जिथून रास्ता ओलांडतात तिथे उपाययोजनांची आवश्यकता आहे.

मे महिन्यात देशात १.०२ लाख कोटी GST वसूली

  • मे २०२१ मध्ये देशात वस्तू आणि सेवा कर रूपाने (tax) १.०२ लाख कोटी ₹ मिळाले आहेत.
  • सलग आठव्या महिन्यात १ लाख कोटीं ₹ हून जास्त उत्पन्न जीएसटीद्वारे मिळाले आहे.
  • गेल्या सप्टेंबर २०२० पासून जीएसटीद्वारे आजवर गोळा झालेलं हे सर्वात कमी उत्पन्न आहे.
  • मे महिन्यात जीएसटीमधून वसूल झालेले १,०२,७०९ लाख कोटी ₹ हे मागील एप्रिल महिन्याच्या तूलनेत २७% कमी आहे. तेंव्हा ६२,१५१ कोटी ₹ गोळा झाले होते.
  • पण मागील मे २०२० मध्ये देशात पूर्ण टाळेबंदी होती तेंव्हाच्या तूलनेत हे ६५% अधिक आहे.

नायजिरियाकडून अनिश्चित कालासाठी ट्विटरवर बंदी

  • नायजिरियन (Nigeria) राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांचे ट्वीट नियम बाह्य असल्याच्या कारणावरून डिलीट करण्यात आले, म्हणून सरकारने टेलिकॉम नियंत्रकांच्या मदतीने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली.
  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. आफ्रिकेतील या सर्वात जास्त लोकसंख्या असणार्‍या राष्ट्राकडून या आधीही असे प्रयत्न झालेले आहेत.
  • राष्ट्राध्यक्ष बुहारी यांनी गेले चाळीस वर्षे चालणार्‍या नायजिरियन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या अशांततेकरता ताकीद देणारं ट्वीट केलं होतं, ते ट्विटरने डिलीट केलं.
  • फुटीरतावादी गटाचे आक्षेपार्ह भाषेतील ट्वीट असून त्याकडे दुर्लक्ष करणं हे ट्विटरचं दुटप्पी धोरण आहे असं नायजिरियन माहिती आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हणलं आहे.

गुजरात लव्ह जिहाद (Love Jihad) कायदा:

  • १५ जून २०२१ पासून हा कायदा गुजरातमध्ये अंमलात आणला जाणार आहे.
  • आता जबरदस्ती, विवाह करून किंवा आमिष दाखवून जर धर्म परिवर्तन केले तर तो आता गुन्हा ठरणार आहे.
  • आढळलेल्या दोषीला १० वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असणार आहे.
  • जर आपला धर्म लपवून खोटा धर्म सांगून विवाह केला असेल तर त्याला २ लाख ₹ दंड ५ वर्षे शिक्षा होणार आहे.
  • जर अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिचे धर्मपरिवर्तन केले तर ३ लाख ₹ दंड व ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
  • हा कायदा मोडणार्‍यांना ३ लाख ₹ दंड व ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole