चालू घडामोडी – 6 जून 2021

रिझर्व्ह बँकेकडून (RBI) विकासदर अंदाज आणखी खालावला.

  • कोरोना महासाथीमुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर अंदाज रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) खाली आणताना महागाई अजून वाढण्याची भीती व्यक्त केली गेली.
  • गेल्या आर्थिक वर्षातील विकासदर उणे ७.३% नोंदवला गेला आहे. 
  • नुकत्याच गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाच्या माध्यमातून नवीन उपाययोजना जाहीर केल्या. आदरातिथ्य, नोकरदार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
  • दुसरे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना दास यांनी चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) ९.५% असेल, असे वर्तवले. तर या पूर्वी हा अंदाज १०.५% होता. व महागाई ५.१% राहण्याची शक्यताही वर्तवली.
  • रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या पटधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले आहेत. दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर (Repo rate) किमान अशा चार टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.

म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित

  • म्युकरमायकोसिस चे उपचाराचे दर सामान्य लोकांना परवडणारे नाहीत म्हणून आता हे दर निश्चित केले गेले आहेत.
  • दर निश्चित करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. व दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत.
  • वार्ड मधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ४०००₹, ब वर्ग शहरांसाठी ३०००₹, २४००₹  क वर्ग शहरांसाठी, यांत नर्सिंग, देखरेख, चाचण्या, औषधी, खाटांचा खर्च, जेवण यांचा समावेश.
  • अतिदक्षता विभाग व विलगीकरण ( कृत्रिम श्वसनयंत्रणा नाही): अ वर्ग शहरे- ७५००₹, ब वर्ग शहरे- ५५००₹, क वर्ग शहरे- ४५००₹.
  • अतिदक्षता विभाग व विलगीकरण व कृत्रिम श्वसनयंत्रणा: अ वर्ग शहरे- ९०००₹, ब वर्ग शहरे- ६७००₹, क वर्ग शहरे- ५४००₹.
  • यांत शस्त्रक्रिया हा महत्वाचा घटक असून २८ प्रकारच्या शास्त्रक्रियांचा दरही निश्चित केला आहे. अ वर्ग शहरे- १लाख ते १० हजार ₹, ब वर्ग शहरे- ७५हजार ते ७५०० ₹, क वर्ग शहरे- ६०००० ते ६०००₹ पर्यंत.
  • अ वर्ग शहरे: मुंबई महानगर, पुणे महानगर, व नागपूर महानगर
  • ब वर्ग शहरे: नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, वसई- विरार, मालेगाव, नांदेड यांच्यासह जिल्हा मुख्यालये.
  • क वर्ग शहरे: अ व ब मध्ये नसलेली अन्य सर्व शहरे.

भारतीय नौदलासाठी आणखी सहा पाणबुड्या.

  • संपूर्ण देशी बनावटीच्या सहा पारंपरिक पाणबुड्यांची बांधणी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली.
  • या महाप्रकल्पासाठी ४३ हजार कोटी ₹ इतका करच येणार आहे.
  • या महाप्रकल्पाचे नामकरण ‘पी -७५ इंडिया’ असे करण्यात आले आहे.
  • चीन आपल्या सागरी क्षमतेमध्ये वाढ करत असल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे धैर्य वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला.
  • संरक्षण क्षेत्रातील परदेशी कंपन्यांसोबत देशी संरक्षण उत्पादकांची भागीदारी असावी अशी चर्चा सुरू होती त्यानुसार या पणबुड्यांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
  • या प्रकल्पाची अंमलबजावणी १२ वर्षांत करण्यात येणार आहे. लार्सन अँड टर्बो व माझगाव डॉक लि. ला विनंती प्रस्ताव देण्यात आला आहे.

आयएनएस संधायक निवृत्त

  • आयएनएस संधायक हे भारतीय नौदल ताफ्यातील जलमापचित्रक सर्वेक्षण करणारं जहाज होतं. हे पूर्ण स्वदेशी बनावटीचं जहाज ४० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालं.
  • हे जहाज बांधण्याची संकल्पना भारताचे मुख्य जलालेखक रिअर ऍडमिरल एफ.एल.फ्रेसर यांची होती.
  • याचं डिझाईन ठरल्यावर गार्डन रिच शिप बिल्डरर्स लि. (GRSE ) कोलकाता येथे त्यांची बांधणी झाली.
  • २६ फेब्रुवारी १९८१ या दिवशी हे जहाज नौदल ताफ्यात दाखल करण्यात आलं होतं.
  • विशाखापट्टणम च्या बंदरावर या जहाजाला सुर्यास्ताला निरोप देण्यात आला.

स्पुटनिक व्ही साठी सिरमने परवानगी मिळवली.

  • रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही ही लस बनवण्याची परवानगी औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) सिरमला दिली.
  • रशियाची राजधानी मॉस्को येथील गॅमालेया इस्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेच्या सहयोगाने सिरम या लसीचं उत्पादन करणार आहे.
  • या लसीला परीक्षण, विश्लेषण व चाचण्या करण्यासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली.
  • त्यामुळे कोव्हीशिल्ड नंतर स्पुटनिक व्ही लसीचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • स्पुटनिक व्ही बनवणारी सिरम ही सहावी कंपनी आहे.
  • भारतात डॉ. रेड्डीज् लॅब ही स्पुटनिक व्ही लस तयार करते.
  • आत्तापर्यंत ५० होऊन अधिक देशांनी स्पुटनिक ला मान्यता दिली आहे.

५ जून जागतिक पर्यावरण दिन

  • संकल्पना: उत्तम पर्यावरणासाठी जैवइंधनाला प्रोत्साहन
  • २०२०- २५ या पाच वर्षात इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाचा तज्ञांचा अहवाल पंतप्रधान सादर करतील.
  • भारत सरकारने तेल कंपन्यांना या पर्यवरणदिनाच्या निमित्ताने सूचना केली आहे की १ एप्रिल २०२३ पासून सर्व कंपन्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करावी ज्यात २०% इथेनॉलचं प्रमाण असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole