चालू घडामोडी – 04 जूलै 2021

Covid 19 -दुसरी लाट अजूनही कायम

 • केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला छोट्या राज्यांमध्ये वाढता प्रादुर्भाव
 • लसीकरणावर भर देणे आणि नियम-बंधने पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला.
 • देशात सलग २५ दिवस कोरोनाचा सरासरी संसर्गदर ५% पेक्षा कमी आहे.
 • आठवडाभरात दैनंदिन रुग्णवाढीत ही १३% घट झाली आहे.
 • पण ७१ जिल्ह्यांमध्ये अजूनही संसर्गाचे प्रमाण १०% पेक्षा अधिक आहे.महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील परिस्थिती आटोक्यात असली तरी केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, मणिपूर या सहा छोट्या राज्यांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत.
 • युरोप, इस्राएल, रशियात पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत.
 • ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ (Johnson and Johnson) केंद्र सरकार चर्चा करत असून ही लस ही हैदराबाद ‘बायो-ई’ कंपनीद्वारे उत्पादित केली जाईल.
 • ‘जॉन्सन च्या लशीची फक्त एक मात्रा घ्यावी लागेल आणि ही लस ‘डेल्टा’ उत्परीवर्तीत विषाणूविरोधात प्रभावी ठरेल असा दावा कंपनी ने केला आहे.
 • केंद्राने ‘मॉडर्ना’ (Moderna) या परदेशी लशीलाही मान्यता दिली असून आतातरी कोवॅक्स यंत्रानेमार्फत भारताला या लशी देणगी स्वरूपात मिळतील.
 • रशियन बनावटीच्या ‘स्फुटनिक’ (Sputnik V) या एकमेव परदेशी लशीचे भारतात उत्पादन होत आहे.
 • रुग्णसंख्या वाढत असल्याने साथ योग्य प्रकारे हाताळण्यासाठी केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मणिपूर या राज्यांत केंद्र सरकार पथके पाठवणार आहे.
 • या दोन सदस्यीय पथकात एक डॉक्टर व एक आरोग्य तज्ञाचा समावेश असेल.

वीज तारांद्वारे होणाऱ्या शिकारीला आळा

 • जिवंत विद्युत तारांचा शोध घेणारी २० उपकरणे महाराष्ट्राच्या वनखात्यात दाखल झाली असून राज्यातील पाच व्याघ्रप्रकल्पांमध्ये ही उपकरणे वापरण्यात येणार आहेत.
 • जिवंत विद्युत तारा सोडून होणारी वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी या उपकरणांची मदत होत आहे.
 • ‘ अटल इनोव्हेशन सेंटर (Atal Innovation Center) व आंध्रप्रदेशातील ‘श्री कृष्णदेवराय विद्यापीठाने’ WWF-India यांच्या सहकार्यातून २०१९ मध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती.
 • या स्पर्धेत जिवंत विद्युत प्रवाह कसे शोधायचे यांसारखी आव्हाने विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.
 • या स्पर्धेत कुप्पम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ही संकल्पना मांडली.
 • जिवंत विद्युतप्रवाह कुठे सोडण्यात आले आहेत याचा या उपकरणाच्या माध्यमातून शोध घेता येतो.
 • उपकरणात त्यावेळी बीप बीप असा आवाज येतो.यांत टॉर्च व बॅटरी इंडिकेटर ही आहे.
 • उपकरणाची बॅटरी संपत आल्यास लगेच कळते. भ्रमनध्वनीच्या (Mobile) च्या चार्जरने सुद्धा हे उपकरण चार्ज होऊ शकते, व ११ – १२ तास चालते.
 • तृणभक्षी प्राणी पिकांचे नुकसान करतात म्हणून शेतकरी कुंपणावर जिवंत विद्युतप्रवाह सोडतात.
 • शिकारीही वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी याचा वापर करतात.
 • यात कित्येकदा शेतकरी आणि गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो.
 • हे उपकरण वनक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱयांसाठी सोयीचे आहे.
 • महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड मध्ये जिवंत विद्युतप्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे.

बालभारती पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु

 • समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
 • पहिल्या टप्प्यात राज्यातील दुर्गम भागात पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून उर्वरीत ठिकाणी पुस्तके काही दिवसांत दिली जातील.
 • बालभारतीने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ संकेतस्थळावर मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 • आता पर्यंत सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके डाऊनलोड झाली आहेत.

MPSC च्या C-SAT साठी तज्ज्ञ समिती

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सी-सॅट चा केवळ पात्र करावा. अशी मागणी स्पर्धा परिक्षार्थींची आहे.
 • आयोगही यासाठी सकारात्मक आहे.
 • मात्र आयोगाला या संदर्भात परस्पर निर्णय घेण्यास मर्यादा असल्याने तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमून ‘सी-सॅट’ पेपरवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
 • तीन महिन्यांत परिक्षेबाबत अहवाल अपेक्षित.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.