चालू घडामोडी- 02 जूलै 2021

राष्ट्रीय डॉक्टर दिवस- १ जुलै २०२१

 • १९९१ पासून हा (National Doctor’s Day) दिवस साजरा केला जाऊ लागला. बंगाल प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. बी.सी.रॉय यांनी मानवतेसाठी स्वतःचं आयुष्य वेचल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.
 • डॉ.रॉय खूप प्रख्यात डॉक्टर होऊन गेले, त्यांचं या वैद्यकीय क्षेत्रात कार्य खूप मोठं आहे.
 • ते १ जुलै १८८२ जन्मले आणि १९६२ च्या याच दिवशी त्यांचं निधन झालं.
 • त्यांना ४ फेब्रुवारी १९६१ ला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
 • जाधवपूरचं टी.बी. रुग्णालय, चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल, व्हिक्टोरिया इन्स्टिट्युशन/ कॉलेज, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल, चित्तरंजन सेवा सदन महिला व मुलांसाठी या सगळ्या वैद्यकीय संस्था उभ्या करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
 • भारतीय उपखंडात ते पहिले वैद्यकीय सल्लागार होऊन गेले. (british medical journal) ब्रिटिश वैद्यकीय संशोधन पत्रिकेत त्यांच्या बद्दल छापून यायचं.

राजू केंद्रे- जागतिक स्तरावरची ‘चेवनिंग शिष्यवृत्ती’

 • नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती साठी राजू केंद्रे या सामजिक कार्यकर्ता विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
 • शिष्यवृत्ती मंडळाने राजुला शेवटचा प्रश्न विचारला, “तुझी या स्कॉलरशिपसाठी निवड झाली नाही तर काय करशील?” तर त्याने यांवर उत्तर दिलं की “जर माझी निवड नाही झाली तरी पुढच्या १० वर्षात १० एकलव्य चेवनिंग स्कॉलरशिप असतील” असं उत्तर त्याने दिलं.
 • जगभरातील ६० देशांमधील १३५० विद्यार्थ्यांमधून त्याची निवड झाली.
 • Foreign Commonwealth विभागाच्या वतीने दिली जाणारी चेवनिंग शिष्यवृत्ती (Chevning Scholarship) ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील मानाची व महत्वाची समजली जाते.
 • जवळपास ४५ लाख ₹ ही शिष्यवृत्ती असून इंग्लंडमध्ये लागणारा सर्व खर्च पुरवते.
 • पिंप्री-खंदारे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा हे राजू केंद्रेचं गाव आहे. त्यांची या गावात शेती आहे आईवडील तिथे शेती करतात.
 • राजू केंद्रे याने सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे अतिथी अध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अकॅडमी’ नावाने शैक्षणिक चळवळ सुरू केली.
 • मुख्यमंत्री फेलोशिप मध्येही त्याने यावतमाळमधील पारधी बेडयांवर काम केले आहे.

राज्यात पाच ठिकाणी उर्दू घरं

 • राज्यात उर्दू भाषेची वाङ्मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी विचारवन्त इ. सृजनशील विचारांची देवाणघेवाण करून उर्दू भाषेचा विकास व्हावा, यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडून राज्यात पाच ठिकाणी उर्दू घर निर्मिती करण्यात येणार आहे.
 • नांदेड, सोलापूर, मालेगाव तसेच मुंबई विद्यापीठाच्या परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून त्या बाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे.
 • नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित केली जाणार आहे.
 • या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इ. स्वरूपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी, आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील.
 • नवी दिल्ली येथील उर्दू भाषा राष्ट्रीय परिषद (national council for promotion of urdu language) या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम अभ्यासक्रम चालवले जातील. यासाठी परिषदेकडून अनुदान व मार्गदर्शन मिळवले जाईल. उर्दू भाषिक नसलेल्या समुदायासाठी उर्दू शिकवण्याचे वर्ग चालवले जाणार आहेत.

समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची समस्या गंभीर

 • गेल्या काही दिवसांपासून पाऊस विशेषतः तौक्ते वादळानंतर राज्यातील सगळ्याच किनारपट्टयांवर समुद्रातून फेकल्या गेलेल्या कचऱ्याने निर्माण झालेल्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे सध्या प्रशासनावर प्रचंड ताण आहे.
 • परंतु समुद्रातून पुन्हा किनाऱ्यांवर फेकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे गंभीर पर्यावरणीय प्रशद्बा निर्माण झाला असून त्याकडे दुर्लक्ष करत येणार नाही असे नमूद करून उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
 • शुक्रवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पालिकेला दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.