02 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

गरिबांना आणखी 5 महिने मोफत धान्य

  • कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या शिथिलीकरनाचा दुसरा टप्पा 1 जुलै 20 पासून सुरू झाला यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले.
  • आता सणासुदीचा काळ सुरू होईल आणि जनतेच्या गरजा वाढून खर्च वाढतील म्हणून गरिबांना आणखी 5 महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एसटी मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना

  • लॉकडाऊन मुळे राज्याची आर्थिक स्थिती कमालीची बिघडली आहे ती सुधारण्यासाठी राज्य सरकार विविध गोष्टीवर विचार करत आहे. यामध्ये एसटी महामंडळ स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्याचे विचार चालू आहेत.
  • 1 लाख कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च कमी करण्याच्या उद्देशाने योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेमध्ये महामंडळातील तब्बल 27 हजार अधिकारी, कर्मचारी पात्र ठरू शकतात.

सरकारी कामकाजात मराठीचा वापर सक्तीचा

  • महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असून तिचा वापर सरकारी कामकाजात होणे आवश्यक आहे. याबाबत सरकारने अनेकदा सूचना आणि आदेश देऊनही अनेक अधिकारी यावर टाळाटाळ करताना दिसत आहेत.
  • मराठीचा वापर न करणाऱ्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दोषी आढळल्यास कर्मचाऱ्याची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुल्करचनेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार

  • महामारीच्या पार्श्वभूमीवर खासगी विना अनुदानित शाळा किंवा परीक्षा मंडळाच्या फी मध्ये कोणतीही वाढ करता येणार नाही अस महाराष्ट्र सरकारने सांगितले होते.
  • याबाबत, फी रचनेत किंवा शुल्कवाढ रोखण्याचा राज्य सरकारला कोणताही अधिकार नाही असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात खाणकामास बंदी

  • केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना जाहीर केली आहे.
  • या अंतिम सूचनेनुसार, प्रकल्पाच्या चारही बाजूला 3 ते 16 किलोमीटरवर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole