प्रवासी भारतीय दिवस: 9 जानेवारी 2021
परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी प्रवासी भारतीय दिवस परिषद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.
यंदाची सोळावी परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर सुरीनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत.
युवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन 8 जानेवारी 2021 रोजी आभासी माध्यमातून झाली असून, भारत आणि परदेशातील यशस्वी तरुणांना एकत्र आणताना अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. ही परिषद युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.