एक थांबा एकल खिडकी मालवाहतूक व्यवसाय विकास संकेतस्थळ

रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते एक थांबा एकल खिडकी मालवाहतूक व्यवयाय विकास संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

या डिजिटल मंचाच्या माध्यमातून रेल्वेच्या मालवाहतूक ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरून या मंचाच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

नवीन संकेतस्थळाच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप टाळून व्यवसायाच्या गरजांची पूर्तता करण्यावर भर देवून त्याप्रमाणे सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. व्यवसाय सुलभता आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहकांच्या गरजांचा लक्षात घेण्यात आल्या आहेत.

ठळक बाबी

  • एक थांबा एकल खिडकी संभाव्य नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याची संधी उपलब्ध होणार.
  • संकेतस्थळावर नवीन सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वोत्कष्ट सेवा देणे, व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक आणि महत्वाची माहिती प्रदान करणे, त्यांच्या व्यवसायातल्या घडामोडी, देखरेख आणि विस्तार यासाठी महत्वाची भूमिका बजावणे, मालवाहतूक व्यवसाय संकेतस्थळाचा वैयक्तिक डॅशबोर्ड (मंच) उपलब्ध करून ग्राहकांना एका दृष्टिक्षेपामध्ये मालवाहतुकीची माहिती उपलब्ध करून देण्याची सुविधा, तसेच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण व्यवसाय चालविण्यास मदत करणे, GISद्वारे जर एखाद्या ठिकाणी माल पोहोचत नसेल तर माहिती देणे, विविध सेवांसाठी एका क्लिकद्वारे काम, सेवेमध्ये सवलत, पूर्वआरक्षण सुविधा आहेत.
  • एक थांबा एकल खिडकी वर मालवाहतूक केल्या जाणाऱ्या वस्तूनिहाय काम करणे शक्य होणार आहे. त्यासाठी कोळसा, खनिज आणि धातू, अन्नधान्य, मैदा आणि डाळी, सिमेंट आणि खडी, रासायनिक खते, लोखंड व पोलाद, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर सेवा, स्वयंचलित वाहने आणि इतर अशा प्रकारे वेगवेगळ्या मालासाठी स्वतंत्र पृष्ठे तयार करण्यात आली आहेत.
  • खासगी गुंतवणूकीला प्राधान्य देण्यात आले असून खासगी मालवाहू टर्मिनल किंवा स्वतःचे रेल्वे मालवाहू शेड तयार करून पुरवठा साखळीचा भाग बनण्याचा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एक थांबा एकल खिडकी पार्श्वभूमी

  • देशामधल्या मालवाहतूक क्षेत्रामध्ये भारतीय रेल्वे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या पारंपरिक क्षेत्रामध्ये कार्य करतानाच नवीन ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी ग्राहक केंद्रीत दृष्टिकोण भारतीय रेल्वेने विकसित केला आणि फ्रेट ऑन प्रायोरिटी धोरण स्वीकारले.
  • डिसेंबर 2020 मध्ये भारतीय रेल्वेने 118.13 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. ही वाहतूक गेल्यावर्षीच्या याच काळापेक्षा 8.54 टक्के जास्त आहे. या काळामध्ये रेल्वेने मालवाहतुकीतून 11788.11 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने मालवाहतूक करून 6.87 टक्के जास्त उत्पन्न मिळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole